भारतीय अर्थव्यवस्था 1980 पासून (भाग 1)
Indian Economy Since 1980 (Part 1)
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
दरवर्षी सरासरी 7% आर्थिक विकास साध्य करणारी, एक उद्योन्मुख अर्थव्यवस्था म्हणून जगातील सहाव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे येत आहे. अलीकडील भारतीय अर्थव्यवस्था ही एक गतीमान अर्थव्यवस्था आहे. जागतिक पातळीवर विकासाबाबत अग्रेसर आहे. असे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर दारीद्य्र, बेरोजगारी, विषमता, काळा पैसा या प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारने अलीकडील काळात थेट लाभ हस्तांतरण, जनधन योजना, मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, मेक इन इंडिया ह्या योजना सुरू केल्या आहेत. काळा पैशावर आघात करण्यासाठी चलन निश्चलनीकरण केले. अप्रत्यक्ष करांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वस्तू आणि सेवा कर लागू केला.
सदरील पुस्तकात भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, मानव संसाधन व संबंधित समस्या, पायाभूत संरचना, भारतीय कृषीशी संबंधित बाबी, औद्योगिक व सहकारी क्षेत्र, नियोजन आणि नीति आयोग आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अलिकडील बदलांचा समावेश केलेला आहे.
Bharatiya Arthavyavastha 1980 Pasun (Bhag 1)
- भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतातील मानव संसाधन : 1.1 अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था, 1.2 जागतिक अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण, 1.3 भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.4 जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताची सद्यस्थिती, 1.5 मानव विकास, 1.6 लोकसंख्या आणि आर्थिक विकास, 1.7 लोकसंख्या जलद गतीने वाढीची कारणे, 1.8 भारतात लोकसंख्या आधिक्याची स्थिती, 1.9 भारताचे लोकसंख्याविषयक धोरण, 1.10 भारतातील बेरोजगारी आणि दारीद्य्र
- भारतातील पायाभूत संरचना : 2.1 पायाभूत संरचनेचा अर्थ व महत्त्व, 2.2 जलसिंचन, 2.3 ऊर्जा, 2.4 भारतातील वाहतूक क्षेत्र, 2.5 भारतातील दळणवळण/संदेश वहन, 2.6 माहिती तंत्रज्ञान
- भारतीय कृषीच्या मूलभूत बाबी : 3.1 भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व/भूमिका, 3.2 भारतीय कृषीचे स्वरूप, 3.3 नवीन कृषी व्यूहरचना, 3.4 स्वामीनाथन आयोग, 3.5 कृषी वित्त पुरवठा, 3.6 शेतकर्यांची आत्महत्या, 3.7 कृषी विपणन, 3.8 कृषी विपणनात सुधारणांची आवश्यकता
- भारताचा औद्योगिक विकास : 4.1 औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाची भूमिका, 4.2 भारतातील मोठे उद्योग, 4.3 1991 चे नवीन औद्योगिक धोरण, 4.4 भारतातील लघु उद्योग, 4.5 भारतातील सार्वजनिक क्षेत्र, 4.6 औद्योगिक कलह
- भारतीय अर्थव्यवस्थेतील सहकार क्षेत्र : 5.1 सहकार, 5.2 सहकारी बँकींग, 5.3 भारतातील सहकारी आंदोलनाचे मूल्यमापन, 5.4 सहकार आंदोलनाच्या उणिवा आणि त्या दूर करण्यासाठी सूचना
- भारतीय आर्थिक नियोजनातील बदल : 6.1 आर्थिक नियोजन : अर्थ, वैशिष्ट्ये, तर्काधार आणि उद्दिष्ट्ये, 6.2 नियोजनाची व्यूहरचना, 6.3 आर्थिक नियोजनाचे यशापयश, 6.4 बारावी पंचवार्षिक योजना (2012-2017), 6.5 निती आयोग
- भारतीय अर्थव्यवस्थेतील अलीकडील बदल : 7.1 थेट लाभ हस्तांतरण/थेट रोख रक्कम हस्तातरण योजना, 7.2 प्रधानमंत्री जन-धन योजना, 7.3 प्रधानमंत्री मुद्रा बँक कर्ज योजना, 7.4 भारतातील चलन निश्चलनीकरण/विमुद्रीकरण/नोटबंदी, 7.5 मेक इन इंडिया, 7.6 स्टार्ट-अप-इंडिया