सामान्य नकाशाशास्त्र
General Cartography
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
भूगोलशास्त्रातील एक महत्त्वाची शाखा म्हणून नकाशाशास्त्र ओळखली जाते. नकाशा हा भूगोलाचा आत्मा असतो. प्राचीन काळापासून नकाशाशास्त्राचा उपयोग व्यवहारात केला जातो. भूगोलशास्त्राप्रमाणेच नकाशाशास्त्र देखील गतिमान स्वरुपाचे आहे. विवि. कालखंडात नकाशाशास्त्राचा विकास होत आलेला असून आजच्या आधुनिक काळात नकाशाशास्त्राचे स्वरूप डीजीटल झालेले आहे.
मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासूनच नकाशाशास्त्राचा देखील टप्प्याटप्प्याने क्रमशः होत आलेला आहे. भारतातदेखील नकाशाचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे. परंतु तत्कालीन नकाशाचे स्वरूप हे उद्दिष्टापुरते व अवगत ज्ञानाएवढेच मर्यादित होते. नकाशा तयार करण्याच्या तंत्रात अचूकपणा नव्हता. तरीदेखील भारतीय नकाशाशास्त्राला मोठा इतिहास होता. आधुनिक कालखंडात इ.स. अठराव्या शतकात ब्रिटीशांच्या अखत्यारित भारतीय नकाशाशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. भारताचा पहिला अचूक नकाशा इ.स. 1752 मध्ये तयार करण्यात आला. इ.स.1769 मध्ये लॉर्ड क्लाईव्ह यांनी बंगालचे सर्वेअर जनरल म्हणून नियुक्त केलेले जेम्स रेनेल यांनी त्रिकोणीकरण पद्धतीवर आधारित भारताचा अचूक नकाशा तयार केला.
इ.स.1905 मध्ये भारत सरकारच्या सर्वेक्षण विभागाने भारताचे 1 इंचास 1 मैल या प्रमाणावरील 3000 नकाशे तयार केले. हे नकाशे भारतीय स्थलनिर्देशक नकाशे म्हणून ओळखले जातात. असे नकाशे तयार करतांना त्यामध्ये अनेक सांकेतिक खुणा व चिन्हांचा वापर करण्यात आलेल आहे. पुढे जाऊन ब्रिटीश तसेच मेट्रीक मापन पद्धतीत या नकाशांची अधिकाधिक उत्तम निर्मिती होऊ लागली. भारतीय अवकाश संशोधन संस्थाच्या माध्यमातून अनेक उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (दूर संवेदन) उपग्रह प्रतिमांद्वारे आधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण नकाशांची निर्मिती केली जात आहे.
Samanya Nakashashastra
- प्रात्यक्षिक घटक : अ) सांख्यिकीचे सादरीकरण ब) प्रात्यक्षिके.
- नकाशा आणि नकाशाशास्त्राचा परिचय : अ) नकाशाशास्त्र, ब) आधुनिक भारतातील नकाशाशास्त्राचा विकास/ इतिहास, क) नकाशाचे प्रकार ड) नकाशाची प्रमुख अंगे/नकाशाचे घटक इ) नकाशांचे महत्त्व व उपयोग.
- नकाशा प्रमाण : अ) नकाशा प्रमाण ब) नकाशाचे प्रमाण व्यक्त करण्याच्या पद्धती – 1) शब्दप्रमाण किंवा विधानात्मक प्रमाण 2) अंक प्रमाण / संख्या प्रमाण / प्रातिनिधीक अपूर्णांक 3) रेषाप्रमाण / आलेख प्रमाण क) प्रमाणाचे रूपांतर – 1) शब्द प्रमाणाचे रुपांतर अंक प्रमाणात करणे – मेट्रीक मापन पद्धती : उदाहरणे, ब्रिटीश मापन पद्धतीची उदाहरणे 2) अंक प्रमाणाचे रुपांतर शब्द प्रमाणात करा, ब्रिटीश मापन पद्धतीत अंक प्रमाणाचे रुपांतर शब्द प्रमाणात करा. ड) नाविक मैल अंतराचे फूट व मीटरमध्ये रुपांतर करणे.
- नकाशा प्रक्षेपण : अ) नकाशा : अर्थ व व्याख्या, पृथ्वीगोल : अर्थ व व्याख्या ब) नकाशा प्रक्षेपणाचे प्रक्षेपण विकासावर (निर्मिती) आधारित वर्गीकरण क) नकाशा प्रक्षेपणांची निवड, घटकान्वये प्रक्षेपण निवड, ड) विविध प्रक्षेपणांची रचना, गुणधर्म व उपयोग – 1) खमध्य ध्रुवीय गोमुखी किंवा केंद्रीय प्रक्षेपण, 2) खमध्य ध्रुवीय व्यासांतर प्रक्षेपण, 3) दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, 4) एक प्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, 5) बॉनचे प्रक्षेपण किंवा समक्षेत्र शंकू प्रक्षेपण.