अपसामान्य । मनोविकृती मानसशास्त्र
Abnormal Psychology | Psychopathology
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
दिवसेंदिवस शारीरिक आजारासोबत मानसिक आजार सुद्धा वाढत आहे. या मानसिक आजाराला अपसामान्य विकृती किंवा मानसिक विकृती असे म्हणतात. सामान्य माणसापेक्षा एखादा व्यक्ती वेगळे वर्तन करायला लागल्यास त्याला आपण सर्रासपणे ‘मॅड’ या संकल्पनेत टाकतो. परंतु खरे पाहता कोणत्या प्रकारचा मानसिक आजार त्या व्यक्तीला जडलेला आहे याची साधी माहिती सुद्धा आपल्याला नसते. विद्यार्थी, शिक्षकांना हे पुस्तक मोलाचा संदर्भग्रंथ ठरणार आहे. त्यासोबतच दैनंदिन जीवनामध्ये वावरणार्या प्रत्येकच व्यक्तीसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण मानसिक समस्या प्रत्येक घरात तसेच प्रत्येक व्यक्तीत निर्माण होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमाने मानसिक विकृती समजणे, ओळखणे सोपे जाईल यातून मानसिक विकृतीची कारणे माहिती झाल्याने ती उद्भवूच नये यासाठी पुरेपूर प्रयत्न करता येतील. या पुस्तकामध्ये कारणासोबतच उपचार सुद्धा प्रत्येकच मानसिक विकृतीवर स्पष्ट केलेले आहे, त्यातून मानसिक विकृतीला दूर ठेवणे सहज शक्य होईल म्हणूनच या पुस्तकाचा ‘ठेवा’ हा प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठीच अमूल्य असाच ठरणार हे नक्कीच.
Apsamanya | Manovikruti Manasshastra
- मनोविकृतीची ओळख : प्रस्तावना, स्वरूप, व्याख्या, मनोविकृत व्यक्तीची वैशिष्ट्ये; मनोविकृतीमधील अध्ययन घटक – विकृत वर्तन, असामान्य अनुभव, बाह्य परिस्थिती, विकृत वर्तनाचे निराकरण; मनोविकृत वर्तनाचे निर्धारक घटक – 1) दैवी प्रकोप 2) अनुवंशिकता 3) शारीरिक रचना 4) अंतस्त्रावी ग्रंथी
- चिंता विकृती : प्रस्तावना, व्याख्या, भिती आणि चिंता; चिंता विकृतीची लक्षणे – 1) शारीरिक 2) मानसिक 3) वर्तन; चिंता विकृतीचे प्रकार – 1) विशिष्ट अनिवार्य भिती विकृती, विशिष्ट अनिवार्य भितीविकृती कारणे 2) सामाजिक अनिवार्य भितीविकृती, सामाजिक अनिवार्य भिती विकृतीची कारणे
- कायीक (शारीरिक) विकृती : प्रस्तावना; कायीक विकृतीचे प्रकार – 1) वेदना विकृती 2) कायीकीकरण विकृती – चार दु:ख वेदन लक्षणे, दोन जठर आणि आतडे संबंधित लक्षणे, एक लैंगिक लक्षणे, मज्जासंस्थीय मिथ्यादोष एक लक्षण 3) प्रकृती चिंताग्रस्तता 4) रुपांतरण विकृती
- वियोजनात्मक विकृती : प्रस्तावना; वियोजनात्मक विकृतीचे प्रकार – 1) वियोजनात्मक स्मृतीभ्रंश 2) वियोजनात्मक विस्मृतीखंड 3) वियोजनात्मक स्वओळख विकृती 4) वियोजनात्मक व्यक्तीमत्व अप्रतिती विकृती, वियोजनात्मक विकृतीची कारणे; वियोजनात्मक विकृतीवरील उपचार – बोधात्मक उपचार
- मन:स्थिती विकार : प्रस्तावना; मन:स्थिती विकृतीचे प्रकार- अ) एकावस्था मन:स्थिती विकृती- 1) सामान्य अवसाद अ) सामान्य अवसादाचा सौम्य प्रकार ब) सामान्य मन:स्थितीतील विचलनाचे इतर प्रकार
- छिन्नमनस्कता विकृती : प्रस्तावना; छिन्नमनस्कतेची वैशिष्ट्ये – भावनिक अस्वस्थता, संपेषणातील अडथळा, वैचारीक अडचण, संवेदनीक अडथळा, बाह्यजगाचा संबंध तुटणे, भावनेतील अडथळा
- मादक द्रव्यासंबंधी विकृती : प्रस्तावना; मादक द्रव्यासक्ती विकृतीचे प्रकार – 1) मादक द्रव्य अवलंबन 2) मादक द्रव्याचा दुरुपयोग; मादक द्रव्य नशा विकृती, मद्यपानसंबंधी विकृती, मद्याचा अतिरिक्त वापर
- व्यक्तीमत्व विकृती : प्रस्तावना, व्यक्तीमत्व विकृतीची चिकीत्सात्मक वैशिष्ट्ये; व्यक्तीमत्व विकृतीचे प्रकार – अ) विचित्र आणि सनकी वर्तन विकृती – 1) विभ्रमी व्यक्तीमत्व विकृती
- मेंदू विकृती : प्रस्तावना, मेंदूची हानी; मेंदूची हानी झाल्यानंतरचे परिणाम – भावनिकतेचा र्हास, स्मृती र्हास, भाषा क्षमतेमधील अडसर, ठिकाण स्पष्टता न होणे, दृष्टीचा अभाव, वर्तनीक समस्या
- लैंगिक विकृती : प्रस्तावना; लैंगिक दोष क्रियेचे प्रकार – 1) असाधारण लैंगिक आकर्षण – प्रतीकरूप काम आसक्ती, विरुद्धलिंगी वस्त्रधारण आसक्ती, परपीडा-स्वपीडा लैंगिक विकृती
- मतीमंदत्व : प्रस्तावना; मतीमंदत्व पातळी – सौम्य मतीमंदत्व, मध्यम मतीमंदत्व, तीव्र मतीमंदत्व, अतीतीव्र मतीमंदत्व; मतीमंदत्वाचे जबाबदार घटक – 1) जैविक/शारीरिक घटक