शारीरिक शिक्षणात मानसशास्त्राचे मार्गदर्शन व मूल्यमापन
Psychology Guidance Consoling and Evaluation in Physical Education
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
खगोल, भौतिक, रसायन या शास्त्रांप्रमाणेच मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. परंतु ते इतर शास्त्रांपेक्षा निराळे आहे. मानसशास्त्र हे मनुष्याशी निगडित आहे. इतर शास्त्रांच्या मानाने, हे शास्त्र नुकतेच म्हणजे 1000-2000 वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. पण आज असे कोणतेही शास्त्र नाही की ज्याचा संबंध मानसशास्त्राशी नाही. सर्व क्षेत्रांत या शास्त्राची व्याप्ती झाल्याची आढळते. क्रीडा मानसशास्त्र ही क्रीडा तंत्रज्ञानास उपयुक्त ठरणारी मानसशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे. क्रीडा मानसशास्त्राच्या दृष्टीने मुक्त खेळ व हालचालींमधून व्यक्ती आपल्या शक्तीबरोबर भावभावनांचा आविष्कार करते. शारीरिक शिक्षण व खेळ हे मानसशास्त्राच्या केवळ मानवी आचरणाशीच संबंधित नाही, तर मानसशास्त्रात बालक, प्रौढ, वृद्ध, स्त्रिया, पुरूष अशा समाजातील सर्व घटकांच्या वागणुकीशी संबंध येतो. शारीरिक शिक्षणाच्या स्थितीत फार मोठे परिवर्तन घडून आलेले आहे. अनेक प्रकारच्या स्पर्धांमुळे त्यांचे महत्त्व वाढतच आहे. महत्त्वाबरोबर त्यांच्या समस्याही वाढत आहेत. खेळाडूंचे प्रशिक्षणानंतर होणार्या जय-पराजयांनाही कसे पचवावे व यासाठी मनाची वृत्ती कशी असावी म्हणजेच यश आल्यामुळेच अगदीच हुरळून जाऊ नये व अगदी अपयश आले तरी नाराज होऊन खेळाविषयी नकारात्मक विचार निर्माण होऊ नये असा विश्वास क्रीडामानसशास्त्र देते. आधुनिक क्रीडा तंत्रज्ञानाच्या विकासासाठी क्रीडामानसशास्त्र ही अत्यंत उपयुक्त अशी मानसशास्त्राची शाखा आहे. त्यामुळे क्रीडामानसशास्त्र हे अलीकडे स्वतंत्र असे महत्त्वाचे शास्त्र बनू पहात आहे.
Sharirik Shastrat Manasshastrache Margdarshan v Mulymapan
- मानसशास्त्र व क्रीडामानसशास्त्र : 1.1. मानसशास्त्र अर्थ, स्वरुप व व्याप्ती 1.2. क्रीडामानसशास्त्राचे अर्थ व महत्त्व 1.3. क्रीडेचा उपपत्त्या 1.4. वर्तनाचे प्रेरण – ऊर्जा, उर्मी
- वाढ व विकास : 2.1. विकासाच्या अवस्था, वाढ, स्वरूप 2.2. आनुवांशिकता व वातावरण
- मानसशास्त्र व क्रीडामानसशास्त्र : 3.1. अध्ययनाचा अर्थ, प्रक्रिया व स्वरूप 3.2. अध्ययनाच्या पद्धती (उपपत्ती) 3.3. अध्ययनाचे नियम (थॉर्नडाईक) 3.4. अध्ययनाचे प्रकार 3.5. अध्ययन संक्रमण 3.6. कारक विकासाचा अर्थ आणि संकल्पना
- बुद्धिमत्ता स्वरूप व विकास : 4.1. बुद्धीमत्ता अर्थ व स्वरुप 4.2. बुद्धीच्या उपपत्या 4.3. बुद्धिगुणांक
- चिंता व भावना : 5.1. भावना अर्थ, प्रकार आणि स्वरूप 5.2. भावनेच्या उपपत्ती 5.3. चिंता 5.4. खेळाडूच्या चिंतेचे वर्गीकरण 5.5. भावना, चिंता याची खेळातील भूमिका
- प्रेरणा : 6.1 प्रेरणेचा अर्थ 6.2 प्रेरणेचे प्रकार 6.3 प्रेरणेचे महत्त्व 6.4 प्रेरणेची तंत्रे
- व्यक्तिमत्त्व : 7.1. व्यक्तिमत्त्वाच्या निरनिराळ्या व्याख्या 7.2. व्यक्तिमत्त्व विकासार परिणाम करणारे घटक 7.3. खेळाडूच्या सादरीकरणात व्यक्तिमत्त्वाचा संंबंध 7.4. समूह गती, विज्ञान व खेळ 7.5. वैयक्तिक भिन्नता 7.6. व्यक्तिभेदाची कारणे 7.7. समायोजन आणि विषमायोजन
- व्यक्तिभेद : 8.1. क्रीडा स्पर्धा व सहकार्य 8.2. स्पर्धांचे प्रकार 8.4. सहकार्य : अर्थ 8.5. ताण आणि थकवा 8.6. थकवा
- स्पर्धा : 9.1. संवेदना आणि अवबोधनचा अर्थ 9.2. विचार – अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार 9.3. अवधान – अर्थ, प्रकार