नारो शंकर राजेबहाद्दर आणि मालेगांवचा इतिहास
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
नारोशंकर राजेबहाद्दर आणि त्यांच्या घराण्यासंबंधी माहिती गोळा करण्याकरीता मराठ्यांच्या इतिहासाच्या सागरात उडी टाकून त्यातून हिरे जवाहिर शोधून आणणे अतिकष्टाचे कार्य होते. मालेगांवची ही वसाहत कशा पध्दतीने टप्प्याटप्प्याने उदयास आली आणि कशा पध्दतीने ती वाढली? भूतकाळातील एक लहानसं खेडं क्रमाक्रमाने इतक्या मोठ्या शहरामध्ये कसे रुपांतरीत झाले. विविध टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढीची काय कारणे होती? हिंदू आणि मुसलमान कोठून आले? केव्हा आले? त्यांच्या स्थलांतराची काय कारणे होती? या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सदर ग्रंथात मालेगांवचा भूगोल आणि नामकरण, मालेगांव कोणत्या काळात कोणाचे राज्य होते, नारो शंकर राजे बहाद्दर घराण्याचा इतिहास, मालेगांवच्या भुईकोट किल्ल्याची रचना, मालेगांवच्या किल्ल्याचे युध्द, बस्ती बसना खेलना ही है, हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य युध्दात मालेगांवचा सहभाग, नैसर्गिक आपत्ती आणि रोगांच्या साथी, पॉवरलूम उद्योगाचा इतिहास, मालेगांवातील इस्लामी शिक्षणाचा इतिहास या सर्व घटनांचा परामर्श डॉ. इलियास सिद्दीकी यांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे.
- मालेगांवचा भूगोल आणि नामकरण : भौगोलिक स्थान-सामरीक महत्त्व-मालेगांव या नामकरणाची सबब, अकराशे वर्षापूर्वीचा मालेगांव-मालेगांवचे ताम्रपट, द्रविड संघ, अमोघ मान्य खेट आणि कुरंदक
- मालेगांव कोणत्या काळात कोणाचे राज्य होते
- नारो शंकर राजे बहाद्दर घराण्याचा इतिहास : प्रारंभ, एक कथन, उदाजी पवार बरोबर, मालवाकडे, इंदूरचे दिवाण, बुंदेलखंडावर हल्ला आणि झांसी येथे मुक्काम, बाजीराव पेशव्याचा विजय
- मालेगांवच्या भुईकोट किल्ल्याची रचना : जागेची निवड, जमिनीचा तपशिल, दगडाचा बंदोबस्त, उत्तर-हिंदुस्तानातील कारागीर, किल्ल्याचे विशेष भाग, मुख्य-इमारतीचा तपशील, उत्तरेकडील भिंत
- मालेगांवच्या किल्ल्याचे युध्द : थाळनेरचे युध्द, मालेगांवचे युध्द, करार, जखमी आणि मृतांचा तपशील, इंग्रजांनी युध्दात वापरलेल्या शस्त्राचा तपशील, किल्ले उद्ध्वस्त करण्याची मोहीम
- बस्ती बसना खेलना ही है : लोकसंख्या वाढीतील महत्वाचे टप्पे, किल्ल्याचे बांधकाम, अरब सैनिक, फौजी-छावणी, सन 1857 चे स्वातंत्र्य युध्द-यंत्र मागाची सुरुवात आणि हैद्राबादचे पतन
- हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य युध्दात मालेगांवचा सहभाग : अरब शिपायांचा संघर्ष-अरब सैनिक कोण होते-काही तथ्ये-1857 चा क्रांतीकारी संघर्ष, 1921 ची खिलाफत चळवळ-खिलाफत
- नैसर्गिक आपत्ती आणि रोगांच्या साथी : 1873 चा पूर-1896 चा पूर-पूरा नंतर दुष्काळ-मालेगांवात प्लेग-अन्य साथी-1944 चा पूर-1952 ची मंदी आणि सुताचा तुटवडा-1954 चा पूर-1968 चा पूर-1969 चा महापूर-1973 चा दुष्काळ आणि मंदी.
- पॉवरलूम उद्योगाचा इतिहास : प्रस्तावना-करघांचे युग-शटल हातमागाकडे-साडी बाजार-पॉवरलूमची सुरुवात, कच्च्या-पक्क्या रंगाचा घोळ-पहिली कोटा सिस्टीम, मालेगांवच्या विणकरांचे शोध
- मालेगांवचा शैक्षणिक इतिहास : प्राचीन शिक्षण व्यवस्था-एकोणीसाव्या शतकातील शिक्षण-मालेगांवात शिक्षणाची सुरुवात-शैक्षणिक संस्था आणि संबंधित व्यक्ती-कर्मवीर भाऊसाहेब हिरे
- मालेगांवातील इस्लामी शिक्षणाचा इतिहास : मदरसा म्हणजे काय? मालेगांवात धार्मित शिक्षणाचा आरंभ, सुरुवातीचे मदरसे, विसाव्या शतकाचा पूर्वार्धाचा काळ-सद्यःस्थिती, मालेगांवातील मदरसे (विद्यार्थ्यांसाठी)-विद्यार्थिनिसाठी मदरसे.