सूक्ष्म अर्थशास्त्र
Micro Economics
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
सूक्ष्म अर्थशास्त्र हे एक मानवी जीवनाशी निगडीत अशा आर्थिक व्यवहारांचे अध्ययन करणारे एक सामाजिक शास्त्र आहे. मानवी जीवनात धन किंवा संपत्तीला अनन्य साधारण महत्व आहे. धन किंवा संपत्ती म्हणजेच पैशाची प्राप्ती करण्यासाठीच मानव विविध वस्तू वा सेवांचे उत्पादन करतो. उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या चार घटकांचे प्रमाणशिर एकत्रीकरण केले जाते. उत्पादन घटकांच्या वापराबद्दल घटक किंवा घटक मालकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा रूपात आर्थिक मोबदला प्राप्त होतो. प्राप्त मोबदल्याच्या साहाय्याने वस्तू वा सेवांचा विनिमय केला जातो आणि त्यांचा उपभोग घेतला जातो. उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रिया करतांना मानव जे वर्तन करतो त्याचे सूक्ष्म अर्थशास्त्रात अध्ययन केले जाते. 1776 मध्ये अॅडम स्मिथ यांचा ‘राष्ट्राची संपत्ती’ हा मौलीक ग्रंथ प्रकाशित झाला आणि तेव्हापासून अर्थशास्त्र ह्या अभ्यास विषयाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. 1776 पासून ते आजपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या विषयाचा प्रचंड विकास आणि विस्तार झाला आहे. या प्रदीर्घ काळात अर्थशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती यात अनेक बदल झाले आहेत.
प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा यथायोग्य प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केलेला आहे. प्रत्येक संज्ञा व संकल्पना सर्वांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.
Sukshm Arthashastra
- सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय व मुलभूत संकल्पना : 1.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, 1.2 फलन संबंध, 1.3 मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था, 1.4 काही मुलभूत संकल्पना
- मागणीचे विश्लेषण : 2.1 मागणीचे विश्लेषण, 2.2 मागणीचा नियम, 2.3 मागणीतील बदल – विस्तार आणि संकोच, 2.4 मागणीतील परिवर्तन- वृध्दी आणि र्हास, 2.5 मागणीची लवचिकता
- मागणीचे समवृत्ती वक्र विश्लेषण : 3.1 क्रमवाचक उपयोगिता दृष्टीकोन/समवृत्ती वक्र विश्लेषण, 3.2 उपभोक्त्याचा समतोल, 3.3 उत्पन्न परिणाम, पर्यायिता परिणाम आणि किंमत परिणाम
- पुरवठा विश्लेषण : 4.1 पुरवठा – अर्थ व व्याख्या, 4.2 उद्योग संस्थेचा हेतू/प्रेरणा, 4.3 पुरवठा निश्चित करणारे घटक, 4.4 पुरवठ्याचा नियम – पुरवठा पत्रक आणि पुरवठा वक्र
- उत्पादनाचे सिद्धांत : 5.1 उत्पादन फलन, 5.2 एक बदलत्या घटकासह उत्पादन, 5.3 बदलत्या प्रमाणाचा नियम, 5.4 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम
- उत्पादन खर्च विश्लेषण : 6.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना, 6.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र, 6.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र, 6.4 खर्च वक्र आकारांचा आधुनिक दृष्टीकोन
- बाजार, उद्योगसंस्थांची प्राप्ती आणि समतोल अटी : 7.1 बाजार – व्याख्या आणि अर्थ, 7.2 बाजाराचे वर्गीकरण, 7.3 बाजाराचा आकार ठरविणारे घटक, 7.4 प्राप्ती/महसूल
- पूर्ण स्पर्धात्मक बाजार : 8.1 पूर्ण स्पर्धा- व्याख्या, अर्थ, वैशिष्ट्ये, 8.2 पूर्ण स्पर्धेशी संबंधीत काही प्रमुख बाबी, 8.3 पूर्णस्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती
- मक्तेदारी बाजार : 9.1 मक्तेदारीचा अर्थ, 9.2 मक्तेदारीतील किंमत निश्चिती, 9.3 मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल/मक्तेदारीतील उत्पादन व किंमत निश्चिती, 9.4 मक्तेदाराचा दीर्घकालीन समतोल
- मक्तेदारीयुक्त स्पर्धात्मक बाजार : 10.1 अपूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा- अपूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, वैशिष्ट्ये/अटी, गृहिते, उद्योगसंस्थेचा अल्पकालीन समतोल
- अल्पविकेताधिकारी आणि द्विविक्रेताधिकारी बाजार : 11.1 अल्पविक्रेताधिकार, 11.2 अल्पवक्रेताधिकारातील किंमत निश्चिती, 11.3 किंमत नेतृत्वात किंमत निश्चिती, 11.4 अल्पविक्रेताधिकारातील किंमत ताठरता
- उत्पादन घटक बाजार : 12.1 उत्पादन घटक- अर्थ व वैशिष्ट्ये, 12.2 विभाजनाचे सिद्धान्त, 12.3 विभाजनाचा सनातन सिद्धान्त, 12.4 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धान्त