बँकिंग तत्त्व आणि व्यवहार
Banking Principle and Practices
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
आज आपण 21 व्या शतकात वावरत आहोत. 20 व्या शतकाच्या मध्यात जगातील सर्व देशांमध्ये बँकींगचा विकास व विस्तार करण्यासाठी त्या-त्या देशाच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केलेत. बँकिंगच्या सर्वांगीण विकासामुळे बँकिंग क्षेत्राला कार्पोरेट क्षेत्राचा दर्जा मिळाला. दररोजच्या आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 60% व्यवहार हे बँकांच्या माध्यमातून होतात असा संशोधकांनी निष्कर्ष काढला आहे. इतके आज आपण बँकिंग क्षेत्राशी निगडीत झालेले आहोत. बँकिंग क्षेत्रात अवलंबिण्यात येत असलेले नवीन प्रवाह, बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा ह्यामुळे तर बँकिंग क्षेत्र बँकेच्या ग्राहकांचा एक अविभाज्य असा घटक बनलेला आहे. आज व्यापार- व्यवसाय, औद्योगिक क्षेत्र, कृषीक्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र अशी विविध क्षेत्र बँकांनी व्यापली असून ह्या क्षेत्रात बँका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विषय अधिक आकलन होण्याच्या दृष्टीने पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी नवीन संज्ञा, नवीन संकल्पना, विविध आकृत्या, विविध नमुने (खारसशी) तसेच मराठी शब्दांना पर्यायी इंग्रजी शब्द देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय समजण्यास सुलभ होईल अशी खात्री आहे.
या पुस्तकात ए.टी.एम., टेली बँकिंग, ई.एफ.टी., ई.सी.एस., डेबीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ई-पर्चेस, ई-मनी, कोअर बँकिंग, सी टी एस ई एफ टी ओ एस अशा बँकिंग क्षेत्रातील अलीकडील सुधारणा व तंत्रज्ञान या सारख्या बँकिंगमधील आधुनिक प्रवृत्ती अभ्यासण्यात आल्यामुळे हे पुस्तक बँकिंग संबंधात अत्याधुनिक झाले आहे.
Banking Tattv Ani Vyavhar
- बँक व्यवसायाचा इतिहास : 1.1 प्रस्तावना, 1.2 बँक व्यवसायाची ऊत्क्रांती, 1.3 बँक : अर्थ व व्याख्या
- बँकांचे वर्गीकरण (प्रकार) : 2.1 बँकांचे रचनात्मक वर्गीकरण, 2.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण
- सहकारी बँकिंग : अर्थ आणि रचना : 3.1 सहकारी बँकांच्या स्थापनेची पार्श्वभूमी, 3.2 सहकार अर्थ
- बँकिंगचे व्यवहार : 4.1 खात्यांचे प्रकार, 4.1.1 मुदत ठेव खाते, 4.1.2 बचत ठेव खाते
- खातेदारांचे प्रकार : 5.1 प्रस्तावना, 5.2 बँक खातेदारांचे प्रकार, 5.2.1 सज्ञान व्यक्तिचे खाते
- व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मिती : 6.1 प्रस्तावना, 6.2 प्रत्यय निर्मिती अर्थ व संकल्पना
- बँकांचा ताळेबंद : 7.1 बँकांचा ताळेबंद
- कर्ज, अग्रम आणि प्रभार : 8.1 कर्ज व अग्रीम, 8.1.1 प्रस्तावना, 8.1.2 कर्ज व अग्रीम
- चलनक्षम साधने/परक्राम्य विलेख : 9.1 प्रस्तावना, 9.2 चलनक्षम दस्त्रऐवज (पत्र)
- प्रदायी बँक : 10.1 प्रस्तावना, 10.2 प्रदायी बँक : अर्थ व व्याख्या
- वसुली बँक : 11.1 प्रस्तावना, 11.2 वसुली बँक : अर्थ, 11.3 ग्राहकांच्या चलनक्षम
- बँकिंग क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान : 12.1 बॅकिंग कार्य आणि सेवा क्षेत्रातील तांत्रिकता
- इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवा : 13.1 अर्थ व संकल्पना, 13.2 इलेक्ट्रॉनिक समाशोधन सेवेचे प्रकार
- केंद्रीय (मध्यवर्ती) बँक व तिची काय : 14.1 प्रस्तावना, 14.2 केंद्रीय बँकींग प्रणालीचा विकास
- मौद्रिक धोरण : 15.1 प्रस्तावना, 15.2 मौद्रिक धोरण : अर्थ व संकल्पना, 15.3 मौद्रिक धोरण : व्याख्या
- नाणे बाजार/मुद्रा बाजार : 16.1 प्रस्तावना, 16.2 नाणे बाजार/मुद्रा बाजार, 16.3 नाणे बाजार/मुद्रा बाजार
- भांडवल बाजार : 17.1 भांडवल बाजार : अर्थ व संकल्पना, 17.2 भांडवल बाजार : व्याख्या