- DESCRIPTION
- INDEX
भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन असून तिचा प्रारंभ सिंधू संस्कृतीपासून होते. सिंधू संस्कृतीच्या पूर्वीसुद्धा भारतात मानवी संस्कृती अस्त्त्विात होती. सिंधू संस्कृतीनंतर वैदिक संस्कृतीचा उदय व विकास झाला.
भारतभूमीत प्राचीन काळात सम्राट चंद्रगुप्ताने आचार्य चाणक्यांच्या सहकार्याने संबंध भारत भूमीवर एक विशाल मौर्य साम्राज्य उभारले. सम्राट अशोकाने पराक्रम करुनही जगाला शांतीचा संदेश दिला. सारनाथ येथील अशोकाच्या स्तंभावरील चार सिंहाचे प्रतीक, अशोक चक्र स्वतंत्र भारताच्या शासनाने राजचिन्ह मानले. मौर्यानंतर गुप्त, वाकाटक, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, राजपूत, चोल, चेर, पांड्य, पल्लव इत्यादी राजकीय सत्ताधिशांच्या काळात सोपरा, भडोच ह्या प्रसिद्ध बंदरातून भारतीय उत्पादीत माल निर्यात होऊ लागला. अनेक प्रकारचे उद्योग कृषी व्यवसायातून पुढे आल्याने भारत सुवर्णभूमी बनली होती. भारतीय राजकीय सत्ता काळातील अजिंठा व वेरुळ लेणी तर शिल्पशास्त्रातील एक आश्चर्य मानण्यात यतेते. या ग्रंथात राजकीय इतिहासाबरोबरच षङ्दर्शने, उषनिषदे, जैन व बौद्ध धर्म, स्त्रियांची परिस्थिती, कायदा व न्यायव्यवस्था, शिक्षण पद्धती, कला व स्थापत्य, शेती, व्यापार व वाणिज्य, सरंजामशाही, धार्मिक व सामाजिक परिस्थिती आणि साहित्य या विषयांवरही सविस्तर प्रकाश टाकला आहे. प्रस्तुत ग्रंथ पदवी, पदव्युत्तर, नेट/सेट आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
Prachin Bharat (Praranbh te 1200)
विभाग १ सामाजिक आणि सांस्कृतिक पध्दत
- भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने : अ) भारत देश, निवासी, भूमी, पर्यावरण, ब) इतिहासाची साधने
- मानवी प्रगतीची वाटचाल : अ) इतिहास पूर्व काळातील मानव जीवन, ब) जुने (पाषाण)
- नवाश्म युगा ची संकल्पना : ताम्रयुग प्रगत संस्कृती
- मोहेंजोदडो- हरप्पा (सिंधु) संस्कृती : अ) मूळ संस्कृती, विस्तार, नगर रचना, नागरी संस्कृतीचा विनाश
- वैदिक वाङ्मयात प्रतिबिंबीत समाज : प्रशासन, आर्थिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थिती.
- भारतातील लोहयुगीन संस्कृती : दख्खन (डेक्कन) मधील दगडी कला संस्कृती.
- वर्ण-जाती आणि धंदेवाईक वर्ग : अ) सामाजिक प्रगती, विवाह आणि मालमत्ता अधिकार
- उत्तर भारतात नवीन धर्म उदयाची पार्श्वभूमी : जैन व बौध्दधर्माची शिकवण (उपदेश)
- मौर्य काळ : अ) मौर्य साम्राज्य, अशोकाचा धर्म, त्याचे स्वरुप व प्रसार, ब) मौर्याची कला व शिल्पकला
- मौर्योत्तर काळ : अ) कुशाण व सातवाहन संदर्भात मौर्यानंतरच्या काळातील
- संगमकाळ : वाङ्मय, समाज आणि संस्कृती.
- गुप्त आणि गुप्तानंतरच्या काळातील प्रगती : (इ.स. १२०० पर्यंत), अ) उत्तर-समाज,कला, शिल्पकला
- स्त्रियांचा दर्जा : विवाह, मालमत्ता (वारसा) हक्क, सती, पडदा आणि देवदासी पध्दत.
- समाज रचना : अ) वर्णात बदल व जातीतील होणारी वाढ, ब) गुलामगिरी आणि सक्तीची मजुरी.
विभाग २ राजकीय व आर्थिक स्थिती
- हरप्पा (हडप्पा) संस्कृती : अ) राजकीय व आर्थिक संघटनेचे स्वरुप. ब) हरप्पा काळातील आर्थिक स्थिती.
- प्रादेशिक राज्यांचा उदय : अ) प्राचीन भारतीय गणराज्ये, ब) महाजन सत्तांचा उदय.
- मौर्य सत्ता : राज्यशासन प्रणाली व आर्थिक स्थिती.
- मौर्योत्तर काळ : अ) शुंग, पश्चिमेकडील क्षत्रप, कुशाण, ब) सातवाहन, दक्षिणेतील सरदार (नायक)
- गुप्त साम्राज्य आणि त्यांचे समकालीन : अ) प्रशासन, शेतजमीन आणि महसूल पध्दत
- गुप्तोत्तर काळ इ.स. ७५० पर्यंत : पल्लव, चालुस्य, वर्धन.
- राज्यसंस्थेचा प्रकार व अर्थव्यवस्था : (इ.स. ७५० ते १२०० मधील), अ) उत्तर भारत – गुर्जर, प्रतिहार
- अरबी, गझनी, घोरी यांचे आक्रमणे व त्यांचा परिणाम