शैक्षणिक तंत्रविज्ञान
Educational Technology
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे कार्य आहे. या विकास कार्याला जोड मिळालेली आहे ती म्हणजे शैक्षणिक तंत्रविज्ञानाची. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. या बदलातूनच शैक्षणिक तंत्रविज्ञानातून शिक्षणक्षेत्र सर्व दृष्टिकोनातून गतिमान झालेले आहे. आजच्या 21 व्या शतकातील प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणक्रमामध्ये तंत्रविज्ञानाचा शिरकाव झालेला आपणास दिसून येत आहे. शिक्षक वर्गाला प्रभावी अध्यापनासाठी आंतरक्रियात्मक फलक, एलसीडी या माध्यमाची मदत घ्यावी लागत आहे. सहज व सुलभ अध्ययन अध्यापन क्रिया घडावी यासाठी तंत्रविज्ञानाची जोड घेणे महत्त्वाचे आहे. अध्ययनासाठी विद्यार्थी आता पुस्तकांच्या बाहेर जावून विकीपीडीया, युट्युब, ऑनलाईन डिक्शनरी, विविध शैक्षणिक वेबसाईटस्, विविध शैक्षणिक अॅप्स तसे हातातील स्मार्ट फोनचा उपयोग करु लागले आहेत. संंबंधित सर्व विषयांची सखोल चर्चा प्रस्तुत ग्रंथातून करण्यात आली आहे.
Shaikshanik Tantravidnyan
- शैक्षणिक तंत्रविज्ञान : 1.1 शैक्षणिक तंत्रविज्ञानाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती आणि आवश्यकता, 1.2 शैक्षणिक तंत्रविज्ञानातील घटक/भाग, 1.3 शैक्षणिक तंत्रविज्ञान व अनुदेशन तंत्रविज्ञान यातील फरक
- संप्रेषण आणि सुचना : 2.1 संप्रेषण आणि अनुदेशन, 2.2 संप्रेषण – संकल्पना, स्वरूप, प्रक्रिया, संप्रेषणाचे घटक, प्रकार, वर्ग संप्रेषण शैक्षणिक तंत्रविज्ञानातील समुह माध्यम उपागम, 2.3 अनुदेशन प्रणाली रचना, अनुदेशन उद्दीष्टांची मांडणी, 2.4 कार्य विश्लेषण/कृती विश्लेषण, 2.5 अनुदेशन कार्यनिती रचना
- अध्यापनाचे स्तर व कार्यनिती : 3.1 अध्यापनाचा स्मृतीस्तर, आकलन स्तर, चिंतन स्तर, 3.2 अध्यापन कार्यनिती, अर्थ, स्वरुप, कार्य, प्रकार, 3.3 अध्यापन वर्तनात सुधारणा, 3.4 फ्लँडरचे आंतर क्रिया विश्लेषण
- अनुदेश तंत्रविज्ञान : 4.1 क्रमान्वित अध्ययन आणि प्रकार – 1) देशीय 2) शाखीय, 4.2 क्रमान्वित अध्ययन साहित्यांचा विकास, 4.3 अध्यापन यंत्रे/ तंत्रे/ शिक्षण मशीन, 4.4 शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानातील संशोधने, 4.5 शैक्षणिक तंत्रविज्ञानातील भविष्यकालीन प्राथमिकता
- शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि पर्यायी शिक्षणासाठी उपयोजन : 5.1 औपचारीक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, प्रासंगीक शिक्षण, मुक्त अध्यायन-अध्यापन करणारे साधने यातील शैक्षणिक तंत्रविज्ञान, 5.2 शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे स्त्रोत केंद्र, 5.3 शैक्षणिक तंत्रविज्ञानातील उदयमुख प्रवाह
- माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान आणि त्यांचे शिक्षणातील उपयोग : 6.1 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाची संकल्पना, 6.2 शैक्षणिक तंत्रविज्ञान व माहिती तंत्रविज्ञानातील संबंध, 6.3 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाचे महत्व आणि व्याप्ती, 6.4 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाचे विविध साधने/माध्यमे
- अनुदेशन अभिकल्प : 7.1 अनुदेशन अभिकल्प, 7.2 अनुदेशन अभिकल्पाचे स्तर/अवस्था – 1) विशिष्ट व उपयुक्त उदिष्ट तयार करणे, 2) उपयुक्त मार्ग तयार करणे 3) मुल्यमापन करणे, 7.3 अनुदेशन अभिकल्पाचे प्रणाली उपागम- 1) प्रशिक्षणाचे मानसशास्त्र, 2) संक्राती विज्ञान/स्वयंनियंत्रीत मानसशास्त्र, 3) प्रणाली विश्लेषण, 7.4 अनुदेशन अभिकल्प विकासाच्या पायर्या
- अध्यापनाची प्रतिमाने : 8.1 अर्थ, स्वरुप, संकल्पना आणि वर्गीकरण/प्रकार, 8.2 प्रकार- 1) पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान 2) सर्जनात्मक विकास प्रतिमान, 3) न्यायतत्व शास्त्रीय अन्वेषण प्रतिमान 4) मानसिक ताण तणाव प्रतिमान
Related products
-
कृषी भूगोल
₹150.00 -
विशेष शिक्षण
₹150.00 -
योग शिक्षण
₹150.00 -
संशोधन पद्धती
₹675.00