माध्यमांसाठी लेखन व संवाद कौशल्य
(मुद्रित व श्राव्य माध्यमे)
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतात वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इ. माध्यमं ही प्रभावी प्रसारमाध्यमं म्हणून ओळखली जातात. या तिनही प्रसारमाध्यमांचा विचार केला तर जागतिकीकरणाच्या या कालखंडात मुद्रित आणि श्राव्य माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. यात वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम आहे तर आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी हे अनुक्रमे श्राव्य व दृकश्राव्य प्रसारमाध्यमं आहेत. विशेषतः आकाशवाणी व दूरचित्रवाणी यांचा विचार केला तर चोवीस तास चालणार्या या माध्यमांनी चकचकीतपणा, आकर्षक मांडणी, व तांत्रिकतेमुळे सर्वसामान्यांवर भुरळ पाडली. या माध्यमांचा आवाका व वेग इतका प्रचंड आहे की, त्यांच्या स्पर्धेत वृत्तपत्र हे मुद्रित प्रसारमाध्यम टिकणार नाही अशी एक भीती निर्माण झालेली होती. परंतु ही भीती फोल ठरली. वृत्तपत्रांनी ऑनलाईन रूप धारण केलेले आहे तर श्राव्य माध्यमे ही चोवीस तास याप्रमाणे प्रसारित होत आहे. म्हणजेच या माध्यमांमधून व्यवसायाची मोठी संधी निर्माण झालेली दिसते. परंतु या माध्यमामध्ये काम करावयाचे असेल तर या माध्यमांसाठी आवश्यक असणारे लेखन कौशल्य हस्तगत करणे गरजेचे आहे. या माध्यमांसाठी लेखन कसे करायचे? या लेखनाचा आकृतिबंध कसा आहे? त्यासाठी कोणते तंत्र? व कोणती पथ्य पाळायची? यासाठी सदर पुस्तक मार्गदर्शकाची भूमिका बजावेल यात शंका नाही.
Madhymasanthi Lekhan and Sanvad Kaushalya
- मुद्रित माध्यमे : स्वरूप आणि परिचय : 1.1 वृत्तपत्राचा उगम व विकास, 1.1.1 मराठी वृत्तपत्र, 1.2 वृत्तपत्राच्या सर्वसाधारण स्वरूपाची माहिती, 1.2.1 वृत्तपत्राचे दैनंदिन कार्य, 1.2.1.1 बातमी संकलन व संपादन, 1.2.2 ऑनलाईन दैनिकाचा परिचय, 1.3 वृत्तपत्राचे कार्य, त्यांची उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्ये, 1.4 वृत्तपत्राची वैशिष्ट्ये, 1.4.1 वस्तुनिष्ठता, 1.4.2 ताजेपणा, 1.4.3 समकालिनता, 1.4.4 परिणामकारकता, 1.4.5 वेगळेपणा
- वृत्तपत्रासाठी लेखन : बातमी आणि जाहिरात : 2.1 बातमी, 2.1.1 बातमी : व्याख्या व स्वरूप, 2.1.2 बातमीचे मूल्यघटक, 2.1.3 बातमीची रचना, 2.1.4 बातमीची भाषा, 2.1.5 बातमी लेखन करतांना पाळावयाची पथ्ये, 2.1.6 बातमी लेखनाचे तंत्र, 2.2 जाहिरात लेखन : स्वरुप व उपयोजन, 2.2.1 जाहिरात : व्याख्या व स्वरुप, 2.3 जाहिरातीचे प्रकार, 2.4 यशस्वी जाहिरात लेखनाची पथ्ये, 2.5 जाहिरात लेखन, 2.6 जाहिरात लेखन चौकट
- वृत्तपत्रासाठी लेखन : 3.1 अग्रलेख, 3.2 वृत्तांतलेखन, 3.2.1 वृत्तांताची व्याख्या व प्रकार, 3.3 स्तंभलेखन व सदरे
- श्राव्य माध्यमे : स्वरूप आणि परिचय : 4.1 नभोवाणी उगम व विकास, 4.2 नभोवाणीच्या कामकाजाच्या सर्वसाधारण स्वरूपाची माहिती, 4.3 नभोवाणीचे कार्य, नभोवाणीची उपयुक्तता आणि ठळक वैशिष्ट्ये, 4.3.1 नभोवाणीची उपयुक्तता, 4.3.2 नभोवाणीचे वैशिष्ट्ये
- नभोवाणीसाठी लेखन : 5.1 भाषण लेखन : स्वरूप व तंत्र, 5.1.1 आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप, 5.1.2 आकाशवाणीवरील भाषणाची रचना, 5.1.3 आकाशवाणीवरील भाषणाची भाषा, 5.1.4 भाषा लेखनाचे तंत्र, 5.1.5 आकाशवाणीवरील भाषण : नमुना उदाहरण, 5.2 श्रृतिकालेखन, 5.2.1 श्रृतिका लेखनाचे स्वरूप
- नभोवाणीसाठी लेखन व संवाद : 6.1 युवकांसाठीच्या कार्यक्रमाचे लेखन, 6.1.1 शालेय कार्यक्रम, 6.1.1.1 कथाकथन, 6.1.2 युवकांसाठी कार्यक्रम, 6.1.2.1 युवावाणी, 6.1.2.2 नभोवाणीवरील चर्चा, 6.2 सरकारी व खाजगी नभोवाणी वाहिन्यांसाठी निवेदन कौशल्य स्वरूप, 6.2.1 उद्घोषणा, 6.2.2 उद्घोषकाचे कार्य, 6.2.3 उद्घोषणा – लेखन व तंत्र, 6.2.4 उद्घोषकाचे भाषिक कौशल्य, 6.2.5 खाजगी नभोवाणी वाहिन्यांसाठी निवेदन कौशल्य