उपयोजित मराठी (भाग 3)
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
कोणतीही भाषा मौखिक आणि लिखित स्वरुपात अस्तित्वात असते. भाषण – संभाषण – सूत्रसंचालन, निवेदन, परिसंवाद इ. मौखिक माध्यमातून तर वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमासाठी त्याचा स्वीकार आपण करतोच. विविध कार्यालयांसाठी व संगणक – इंटरनेट इ. सेवासुविधांसाठी भाषा लेखन ही नित्याची गरज ठरली आहे. या परिक्षेत्रात ‘संपादन कौशल्यांचा परिचय’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक संवाद साधने’ इ. घटकांच्या अभ्यासामुळे मराठीतून दैनंदिन व्यवहार अधिक सुकर होतो.
वाङ्मय हे जीवनातील नैतिकता, सत्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे. हीच नैतिकता आणि सत्य वस्तुनिष्ठ स्वरुपात व्यक्त होण्यासाठी ‘संपादन कौशल्ये’ आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स संवाद माध्यमांचे तंत्र समजून घेऊन गतिमान जीवनाला शिस्त निर्माण करणे आवश्यक आहे. ‘उपयोजित मराठी’ या अभ्यासक्रमात या घटकांचा समावेश असतो. प्रा. डॉ. प्रभाकर जोशी व प्रा. डॉ. किशोर पाटील यांनी परिश्रमपूर्वक या पुस्तकांचे संपादन केले आहे, त्यांचे अभिनंदन!
मराठीच्या जिज्ञासू अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रस्तुत पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शनपर ठरेल असा विश्वास आहे.
– डॉ. शिरीष पाटील
Upyojit Marathi (Bhag – 3)