राजकीय भूगोल
Political Geography
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
एखाद्या राज्यातील किंवा राष्ट्रातील मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय संबंध, आर्थिक विकास, आर्थिक क्रिया, त्या राज्याची किंवा राष्ट्राची समृध्दता, संपन्नता भौगालिक वातावरणाद्वारे प्रभावित, नियंत्रित व निर्धारित होत असते. राजकीय भूगोलाचा अभ्यास प्राचिन काळापासुन केला जातो. ग्रीक व रोमन कालखंडात राज्य भौगोलिक वातावरणाशी संबंधित असल्याचे मानले जात असे. पृथ्वीतलावरील भौगोलिक भिन्नतेचा तत्कालीन राज्यांशी घनिष्ठ संबंध असतो याची ग्रीक व रोमन राज्यकर्त्यांना व विचारवंतांना जाणीव होती. पहिल्या व दुसर्या महायुद्धाच्या काळात राजकीय विचार व डावपेच, लष्करी व संरक्षण विषयक धोरण, युध्दनिती, इत्यादी निश्चित करतांना भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यास केला गेला. तेव्हांपासुन राजकीय भूगोलाच्या विकासाला चालना मिळाली. राजकीय भूगोल ही भूगोलाची महत्वपुर्ण व विकसित आणि स्वतंत्र शाखा म्हणून अभ्यासला जातो. राजकीय भूगोल हा विस्तृत व बहुविध पैलु असलेला विषय आहे. मानवाच्या विविध प्रकारच्या राजनीतीचा व राजपध्दतीचा स्थळ व क्षेत्र या संदर्भातील आविष्कार राजकीय भूगोलात अभ्यासला जातो. पृथ्वीवर निरनिराळया प्रदेशातील भौगोलिक स्थिती व पर्यावरण वेगवेगळे आहे. साहजिकच निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशातील राजकीय पध्दती, शासन प्रणाली, राजनिती वेगवेगळया प्रकारची आढळते. यामुळेच विविध राजकीय प्रदेश निर्माण झालेत. अशा विभिन्न राजकीय प्रदेशांचा राजकीय दृष्टीकोनातुन भौगोलिक घटकांच्या संदर्भातील अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो. थोडक्यात, घटक व राजकारण यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास म्हणजे राजकीय भूगोल होय. राजकीय भूगोलात राजनीती व भौगोलिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. राज्यशास्त्रापेक्षा राजकीय भूगोल भिन्न असल्याचे प्रमुख कारण, म्हणजे राष्ट्रातील ‘क्षेत्रीय विभिन्नता’ हा घटक आहे. जगात ज्या विविध राज्यसंस्था निर्माण झाल्या आहेत त्यांची राजनीती, शासनपध्दती, राजकीय विचार, राजकीय पक्ष, राजकीय धोरण, राजकीय प्रणाली, परराष्ट्रीय धोरण वेगवेगळी आहे. कारण या सर्वांवर त्या त्या राज्यसंस्थेच्या भूप्रदेशातील विविध भौगोलिक घटकांचा जसे राज्यसंस्थेचे स्थान, विस्तार, भू रचना, हवामान, लोकसंख्या, जलसंपत्ती, वनस्पती, प्राणीसंपत्ती, मृदा, खनिज संपत्ती इत्यादींचा परिणाम होतो. ह्या सर्व भौगोलिक घटकांमध्ये प्रदेशपरत्वे भिन्नता आढळते. म्हणूनच वेगवेगळया राज्यसंस्थांची निर्मिती झाली आहे. ह्या सर्वांचा अभ्यास राजकीय भूगोलात केला जातो.
Rajkiya Bhugol
- राजकीय भूगोलाचा परिचय : 1.1. राजकीय भूगोलाचा परिचय व व्याख्या, 1.2. राजकीय भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, 1.3. राजकीय भूगोलाचा इतिहास आणि विकास
- राज्य आणि राष्ट्र यांची उत्क्रांती : 2.1. ‘राज्य’ ही संकल्पना, व्याख्या, 2.2. राज्यातील उत्क्रांती आणि विकासातील केंद्रोत्सारी व केंद्रानुगामी शक्ती, 2.3. राज्याचे स्वरूप आणि रचना, 2.4. राष्ट्र संकल्पना, व्याख्या, 2.5. राज्य व राष्ट्र यातील फरक, 2.6. राज्याचे मुलभूत घटक, 2.7. राष्ट्रनिर्मितीचे घटक, 2.8. राज्याच्या राजकीय जीवनावर परिणाम करणारे मुलभूत घटक
- भूराजनीती : 3.1. भूराजनीतीच्या व्याख्या, 3.2. भूराजनीतीमधील संकल्पना, 3.3. मॅकिंडरचा मर्मभूमी सिद्धांत, 3.4. स्पाईकमॅनचा किनारभूमी सिद्धांत, 3.5. महानचा नाविक शक्ती सिद्धांत, 3.6. भूसामरिकता किंवा भूयुद्धनीती, 3.7. 1945 ते 1990 व 1990 नंतरची भूसामरिकता
- सीमाप्रदेश (सिमांत/सरहद्दप्रदेश) आणि सीमारेषा : 4.1. सीमा- व्याख्या, 4.2. सीमांचे प्रकार, 4.3. सीमा प्रदेश- व्याख्या, 4.4. सीमा व सीमा प्रदेश यातील फरक, 4.5. सीमांचे कार्य, 4.6. भारतीय सीमा
- भूराजनितीक समस्या आणि वाद : 5.1. भारतातील भूराजनीतिक समस्या व वाद, 1) काश्मीर समस्या, 2) मॅकमोहन रेषा, 3) बेळगाव सीमावाद, 4) नक्षलवाद चळवळ