गणित आशययुक्त अध्यापन पद्धती
Content Cum Methodology - Mathematics
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
गणित अध्यापन पद्धतीची विविध पुस्तके आज रोजी उपलब्ध आहेत. परंतु येत्या काही वर्षात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झालेल्या बदलांच्या अनुषंगाने नवीन पद्धती, तंत्रे, प्रतिमाने, मूल्यमापनाच्या पद्धती, गणिती अध्ययनपूरक उपक्रम विकसित झाले. त्यात प्रामुख्याने सहकार्य अध्ययन पद्धती, ज्ञानरचनावाद, कृती आधारीत अध्ययन, मिश्रण अध्ययन, संकल्पना चित्रण, प्रभुत्व अध्ययन या पद्धती व प्रतिमानांचा समावेश आहे. तसेच सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि अभ्यासक्रमातील नवीन प्रवाह यांचा सुद्धा समावेश केलेला आहे. या पुस्तकात गणिताचे स्वरुप, इतिहास, गणित अध्यापनाची उद्दिष्टे, गणित संरचना, आशययुक्त अध्यापन पद्धती संंंकल्पना व गरज, गणित अध्यापनाच्या पद्धती व उपागम, तंत्र, प्रतिमाने, गणित अध्यापनाचे नियोजन, मूल्यमापन, गणितातील अध्ययनपूरक कार्यक्रम, गणित पाठ्यपुस्तक अर्थ, उपयोग, निकष, गणित शिक्षक आणि भारतीय व पाश्चिमात्य गणितज्ञ या प्रकरणांचा समावेश केलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक घटकाची मांडणी अधिकाधिक सोपी, सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील बी.एड. महाविद्यालयातील शिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Ganit Ashayayukta Adhyapan Paddhati
- आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना व गरज : 1.1 आशययुक्त अध्यापन पद्धतीचा ऐतिहासिक दृष्टीकोन, 1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ, संकल्पना व स्वरूप, 1.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीची उद्दिष्टे, 1.4 आशययुक्त अध्यापन पद्धतीची गरज आणि महत्व, 1.5 आशययुक्त अध्यापन पद्धतीची कार्यपद्धती, 1.6 आशययुक्त अध्यापन पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी, 1.7 आशययुक्त अध्यापन पद्धतीच्या पायर्या.
- गणिताचे स्वरूप व महत्त्व : 2.1 गणिताचा अर्थ आणि व्याख्या, 2.2 गणिताचा इतिहास, 2.3 गणित विषयाची व्याप्ती, 2.4 गणित एक संरचनात्मक ज्ञान, 2.5 गणिताची एक स्वतंत्र विशिष्ट भाषा, 2.6 गणिताचे महत्व, 2.7 गणित अध्यापनाची मूल्ये, 2.8 गणिताचा समवाय.
- गणित अध्यापनाची उद्दिष्टे : 3.1 उद्दिष्टांचा अर्थ, 3.2 शैक्षणिक उद्दिष्टांचे प्रकार, 3.3 गणित वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे व त्यांची स्पष्टीकरणे, 3.4 गणित अध्यापनाची सर्व सामान्य उद्दिष्टे, 3.5 गणित विषयाची संरचना, 3.6 गणित पाठ्यक्रम रचनेच्या पध्दती
- उच्च प्राथमिक स्तरावरील गणित अध्यापन-अध्ययन : 4.1 गणित अध्यापनाचे उपागम, 4.2 गणित अध्यापनाच्या पद्धती – दिग्दर्शन, उद्गामी-अवगामी, सहकार्य, 4.3 गणित अध्यापनाची तंत्रे – अध्यययन पद्धती सराव व आकृती कार्य, पर्यवेक्षित अभ्यास, 4.4 गणित अध्यापनाची प्रतिमाने – प्रतिमानाची संकल्पना, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, प्रभुत्व अध्ययन प्रतिमान, 4.5 गणित अध्यापन-अध्ययनातील समस्या
- गणित अध्यापन-अध्ययन नियोजन आणि गणिताचे मूल्यमापन अर्थ, महत्त्व आणि आराखडा : 5.1 वार्षिक नियोजन, 5.2 घटक नियोजन, 5.3 पाठ नियोजन – पाठ नियोजनाचे प्रकार, हर्बार्ट पाठ नियोजन, ज्ञानरचनावाद, पाठ नियोजन नमुना, 5.4 गणिताचे मूल्यमापन – गणिताची घटक चाचणी, संविधान तक्त्यासहीत, 5.5 गणित अध्यापनात नैदानिक चाचणी आणि उपचारात्मक अध्यापन
- गणित शिक्षक : 6.1 गणित शिक्षकाची पात्रता, 6.2 चांगल्या गणित शिक्षकाची गुणवैशिष्टे, 6.3 मूल्य रूजविण्यात गणित शिक्षकाची भूमिका, 6.4 गणित अध्यापनात शिक्षक हस्तपुस्तिकेचे महत्व
- माध्यमिक स्तरावरील गणिताचा अभ्यासक्रम : 7.1 अभ्यासक्रमाची संकल्पना, पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमातील फरक, 7.2 शालेय अभ्यासक्रमात गणिताची गरज आणि महत्व, 7.3 गणित अभ्यासक्रम विकसनाची तत्वे, 7.4 चांगल्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, 7.5 अभ्यासक्रम विकसनातील नवीन प्रवाह
- गणित अध्यापनाचे उपागम, पद्धती आणि प्रतिमान : 8.1 गणित अध्यापनाचे उपागम : संकल्पना प्राप्ती प्रतिमान, संमिश्र अध्ययन उपागम, 8.2 गणित अध्यापनाच्या पद्धती : पृथ्यकरण-संयोजन पद्धती, प्रायोगिक पद्धती, स्वयंशोधन पद्धती, 8.3 गणित अध्यापनाची प्रतिमाने : अग्रत संघटक प्रतिमान, 8.4 संकल्पना : मूलभूत गाभाघटक, जीवन कौशल्ये आणि मूल्ये
- अध्ययन स्त्रोत आणि गणित अध्ययन-अध्यापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : 9.1 अध्ययन स्त्रोत : व्याख्या, प्रकार, अध्ययन स्त्रोताचे महत्व, 9.2 अध्ययन स्त्रोताची योग्य निवड, 9.3 गणित प्रयोगशाळा आणि गणित मंडळ, 9.4 पाठ्यपुस्तक : गणित पाठ्यपुस्तकाची वैशिष्ट्ये आणि पाठ्यपुस्तक विश्लेषण, 9.5 अध्ययनाचे स्त्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : गणित अध्ययन आणि अध्यापनात माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
- गणितातील अध्ययनपूरक उपक्रम/कार्यक्रम : 10.1 गणित मंडळ, 10.2 गणित जत्रा/मेळावा, 10.3 गणित प्रदर्शन, 10.4 प्रश्न मंजुषा कार्यक्रम, 10.5 गणित स्पर्धा परिक्षा, 10.6 गणित छंद वर्ग, 10.7 गणित ग्रंथालय/पुस्तकालय, 10.8 गणित प्रयोगशाळा, 10.9 गणित कोपरा, 10.10 गणिती कोडी, 10.11 गणिती खेळ, 10.12 गणिती प्रश्न, 10.13 गणितातील गमती जमती, 10.14 वैदिक गणित
- मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन : 11.1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन संकल्पना, 11.2 आकारीक आणि संकालित मूल्यमापन, 11.3 गणित अध्ययनाच्या मूल्यमापनाची साधने आणि तंत्र, गणित शिक्षकाचा व्यावसायिक विकास, 12.1 गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाची आवश्यकता आणि महत्व, 12.2 गणित शिक्षकाच्या व्यावसायिक विकासाचे उपक्रम, 12.3 गणित शिक्षकाचे डथजउ विश्लेषण, 12.4 21 व्या शतकात गणित शिक्षकाची भूमिका
- गणितज्ञ : 10.1 भारतीय गणितज्ञ, 10.1.1 आर्यभट्ट 10.1.2 भास्कराचार्य 10.1.3 श्रीनिवास रामानुजन 10.1.4 ब्रह्मगुप्त, 10.2 पाश्चिमात्य गणितज्ञ, 10.2.1 पायथॉगोरस 10.2.2 युक्लिड 10.2.3 रेने देकार्त.