निसर्गोपचार : निरामय, निरोगी जीवनाचा लाभ करून देणारी जीवनपध्दती
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
निसर्गोपचार ही एक उपचार पध्दती आहे. आपल्याला नेहमी माहिती असलेल्या औषधोपचार पध्दती म्हणजे आयुर्वेद, अॅलोपॅथी/इलेक्ट्रोपॅथी, होमिओपॅथी ह्या होत. याशिवाय अॅक्युप्रेशर चिकित्सा व अॅक्युपंक्चर, चुंबक चिकित्सा, योगोपचार आणि निसर्गोपचार या नवीन उपचार पध्दती आहेत. सध्या अलिकडच्या प्रदुषित वातावरणात, रोगट परिस्थितीत निसर्गोपचार चिकित्सा सर्वांना माहिती होणे ही काळाची गरज आहे.
मानवी शरीर आणि मानवी मन यावर ताबा मिळविता येतो, नियंत्रण ठेवता येते. नैसर्गिक आणि सात्विक आहारामुळे शरीरामध्ये बदल घडवून आणता येतात; तर प्राणायाम, ध्यानसाधना, योगासने, दिर्घश्वसन याद्वारे मन बदलविता येते. म्हणजेच निसर्गोपचारामध्ये शरीरावर व मनावर नियंत्रण घालून रोग विकारापासून स्वत:चे संरक्षण करता येते. सध्याच्या युगात निसर्गोपचार पध्दतीमध्ये आहार चिकित्सा, उपवास चिकित्सा, अॅक्युप्रेशर/अॅक्युपंक्चर, योगोपचार, वनौषधी, पुष्पौषधी इत्यादी चिकित्सांचा समावेश केला जातो. याचाच अर्थ असा की, पर्यावरणात, निसर्गसृष्टीत जे काही चांगले आहे त्या सर्वांचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळेच निसर्गोपचार पध्दती ही अत्यंत गुणकारी, चमत्कारी, क्रांतीकारी उपचार पध्दती तयार झालेली आहे. ही पध्दती मानवी जीवनाच्या कल्याणासाठी एक दैवी शक्ती आहे.
Nisargapachar : Niramay, Nirogi Jeevanacha Labha Karun Denari Jeevanpaddhati
1. निसर्गोपचार
2. पृथ्वी/मृदा (माती)
3. आप (जल)
4. अग्नी
5. वायू
6. आकाश
7. संगीत चिकित्सा
8. व्यायाम
9. प्राणायाम
10. ॲक्युप्रेशर
11. चुंबक चिकित्सा
12. आहार
13. निरामय जीवन