दूरसंवेदन आणि जागतिक स्थान निश्चिती प्रकल्प अहवाल
Remote Sensing and GPS Based Project Report
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
दूर संवेदन हे तंत्रज्ञान संगणक व अवकाश विज्ञानातील एक प्रभावी असे तंत्र आहे. पहिल्या महायुद्धानंतर हवाई छायाचित्रापासून सुुरुवात झालेल्या या तंत्राचा वापर आज शेती, खाणकाम, संरक्षण, बांधकाम, सर्वेक्षण, हेरगिरी, खाजगी उद्योग अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होत आहे. आज उपग्रहाच्या मदतीने सगळ्या पृथ्वीचे व इतर ग्रहांचे, अवकाशातील तार्यांचे सेकंद आणि सेकंद चित्रण सुरू आहे. त्यातून भरपूर माहितीचे संकलन होत आहे.
दूर संवेदन तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील उपयोग यासाठी हे तंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे आहे. यासाठी या प्रगत तंत्रज्ञानाची मराठी भाषेतून ओळख करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केलेला आहे.
दूर संवेदन या विषयाचा अभ्यास करणार्या आमच्या विद्यार्थी मित्रांना व अभ्यासकांना या पुस्तकाचा निश्चितपणे उपयोग होईल अशी आशा आहे.
Dursanvedan
प्रकरण 1 : सुदूर संवेदन तंत्राचा परिचय
अ) सुदूर संवेदन म्हणजे काय? सुदूर संवेदनाची गरज
इ) सुदूर संवेदनाची प्रक्रिया
उ) सुदूर संवेदन तंत्राचा उपयोग
ऊ) सुदूर संवेदनाचे फायदे व मर्यादा
प्रकरण 2 : सुदूर संवेदनाची मूलतत्वे
अ) ऊर्जा स्रोत
इ) विद्युत चुंबकिय वर्णपट
उ) विद्युत चुंबकिय विभाग व वातावरणाची परस्पर क्रिया
ऊ) विद्युत चुंबकिय विभाग व भूपृष्ठ यांची परस्पर क्रिया
प्रकरण 3 : सुदूर संवेदन आणि हवाई छायाचित्राचे प्रकार
अ) ऊर्जास्रोतांवर आधारीत सुदूर संवेदनाचे वर्गीकरण
इ) स्थानक आधारीत सुदूर संवेदनाचे वर्गीकरण
उ) हवाई छायाचित्रण, हवाई छायाचित्राचे प्रकार-लंबरूप हवाई छायाचित्रे, तिरकस हवाई छायाचित्र, हवाई छायाचित्राचे प्रमाण
प्रकरण 4 : जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली (पद्धती)
अ) GPS चा ऐतिहासिक परिचय
इ) जीपीएसचे उपयोग
उ) जागतिक स्थान निश्चिती प्रणालीवर आधारीत प्रकल्प अहवालाची पद्धती