धगधगते तळघर
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
कवयित्री उषा हिंगोणेकरांची कविता माणसाच्या सार्वभौम अस्तित्वाच्या निर्मितीसाठी निर्वाण मांडणारी कविता आहे. या कवितेत अनेक धगधगत्या संग्रामांची दृश्ये वाचकाला दिसतील आणि अनेक संग्रामांचे आवाजही वाचकाला ऐकायला येतील. ही कविता, कविता लिहिण्यासाठी वा उषा हिंगोणेकरांना कवयित्री करण्यासाठी लिहिली गेलेली नाही. ही कविता माणसांच्या स्वाभिमानाची, त्यांच्यातील सौहार्दाची आणि सलोख्याची प्रस्थापना करण्यासाठी लिहिली गेलेली आहे. या कवितेतील मूल्यदंड कुठेही वाकत नाही कारण तो माणुसकीच्या सत्याचा आणि सौंदर्याचा अजिंक्य मूल्यदंड आहे. सनातनी व्यवस्थेवर अंगार उधळणारी ही कविता जीवनातील सर्वच असत्यांनाही चौकात उभे करून फटकारे मारते. माणसाला विद्रूप करणार्या सर्व बंधनांचे जाहीर दहन ती करते. पुरुषसत्ताकावर, असत्यसत्ताकावर आणि दंभसत्ताकावर ती सरळ हल्ला चढवते. माणुसकीच्या प्रस्थापनेच्या मार्गात आडवे येणार्या सर्वच अवरोधांच्या चिंध्या ती करते. वाचकाला अशा मुक्त मनस्वीपणाचे पडघम या कवितेतून ऐकायला येतील आणि माणुसकीच्या प्रज्ञानी सौंदर्याशी जोडतील ही खात्री मला आहे.
– डॉ. यशवंत मनोहर
Dhagadhagate Talghar
1. रात्र, 2. आसपास, 3. दु:ख, 4. एक दिवस, 5. दूर, 6. उत्तरांची ज्वाला, 7. मला पुन्हा, 8. माझे अवकाश, 9. चेहरा, एकलेपण, 10. मुद्रा, 11. तू आणि मी, 12. त्रिकाल, 13. रस्ता, 14. हळूहळू, 15. रणांगणात, 16. तुतारी, 17. तोपर्यंत, 18. आता, 19. रातोरात, 20. माझ्या जगण्याच्या अवकाशात, 21. झाड, 22. नवे घर, 23. माझे शब्द, 24. लोक, 25. उदासीनता, 26. युध्द, 27. दीर्घ संवाद, 28. माझे शब्दविश्व, 29. मी लिहितेय कविता, 30. सीमापार, 31. हक्क, 32. उष:काल, 33. तळघर, 34. तू, 35. मी, 36. शोध, 37. मी आणि कविता, 38. अभिनय, 39. एक दिवस, 40. कोंडमारा, 41. उदासी, 42. प्रश्न, 43 विमुक्त, 44. गाठ, 45. माझी लढाई, 46. अजूनही घट्ट, 47. ओळख, 48. जगणे, 49. समुद्र, 50. तुझा-माझा रस्ता, 51. नाते, 52. कवितेत, 53. घनगर्द वेदनेचा कचरा, 54. भेट, 55. आर या पार, 55. रणांगण, 56. नेहमीच, 56. कविताच, 57. परीक्षापर्व, 58. दरवाजा, 59. सोबत, 60. तुम्हाला हवे तसे, 61. विद्रोह, 62. पुन्हा नवे, 63. इथले स्वयंघोषित, 64. शब्द, 65. अस्वस्थ कविता, 66. चक्रव्यूह, 67. कधी, 68. माझे आकाश, 69. ईश्वर, 70. आताच, 71. मुक्त श्वास, 72. बिगुल, 73. अजूनही, 74. कविता, 75. तरीही, 76. घर आणि जागा, 77. माझी मुद्रा, 78. लढाई, 79. विश्वास, 80. वाटचाल, 81. निर्भया, 82. माझी कविता, 83. माझा विद्रोह, 84. या धगीनेच, 85. भीती, 86. मोर्चा, 87. या प्रदेशात, 88. वेदनेचे घनदाट जंगल, 89. मलाही, 90. मला पाहाचय तुला, 91. पानगळीत, 92. माझे घर, 93. माझ्या कवितेत, 94. प्रवाह, 95. दहशत, 96. पूल, 97. पडझड