व्यक्तिमत्त्व विकास
Personality Development
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
व्यक्तीला बाह्यरुपाने आकर्षक बनविणार्या गोष्टींनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरत नाही. व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक गुणधर्मात सामावलेले नसून ते संघात स्वरूपी आहे. या संघात स्वरूपी घटकांमध्ये केवळ सुसंगतपणे व सातत्याने दिसून येणार्या शारीरिक-मानसिक-सामाजिक गुणधर्मांचा समावेश होतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ज्या गुणधर्मावरून स्पष्ट होते त्या गुणधर्माचा आविष्कार सामाजिक वर्तनामध्ये दिसून येत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व या कल्पनेस सामाजिक संदर्भ प्राप्त झाला. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर व्यक्तींवर प्रभाव पडतो. हा प्रभाव वर्तन विशेषातून पडतो. वर्तनाच्या मुळाशी मानसिक कल, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता इ. गोष्टी असतात. म्हणून व्यक्तिमत्त्व हे या सर्वांचा संघात होय. व्यक्तीला व्यक्तित्व असून व्यक्तिमत्त्व देखील असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यात मूलतः फरक आहे. व्यक्तिमत्त्व सतत बदलत असते. कारण जीवनातील अनुभवांची भर त्यात सारखी पडते. व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य संशोधकांनी, तत्ववेत्यांनी केला आहे.
प्रस्तुत पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सादरीकरण कौशल्य, श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, सुदृढ/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व, समाज आणि मानवी संबंध, वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, भावनिक बुद्धीमत्ता, व्यवसाय नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखती, व्यक्तीमत्व आणि अभियोग्यता कसोट्या इ. विविधांगी मुद्द्यांचा सर्वांगीण परामर्श घेतला आहे.
Vyaktimatav Vikas
- व्यक्तिमत्त्व विकास : 1.1 प्रास्ताविक, 1.2 व्यक्तिमत्त्व विकासाची संकल्पना, 1.3 व्यक्तिमत्त्व विकासावर परिणाम करणारे घटक, 1.4 व्यक्तीच्या विकासात नैतिकता, आचारसंहिता आणि मूल्ये यांची भूमिका, 1.5 नेतृत्व कौशल्य, 1.6 सादरीकरण कौशल्य, 1.7 श्रवण कौशल्य, 1.8 संभाषण कौशल्य
- सुदृढ/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व : 2.1 प्रास्ताविक, 2.2 व्यक्तिच्या विकासात अनुवंशिकता आणि वातावरणाची भूमिका, 2.3 चारित्र्याची बांधणी, 2.4 समाज आणि मानवी संबंध
- वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन : 3.1 प्रास्ताविक, 3.2 संघर्ष व संघर्ष व्यवस्थापन, 3.3 संघर्षाची संकल्पना, 3.4 संघर्षाचे प्रकार, 3.5 संघर्षाचे परिणाम, 3.6 संघर्ष व्यवस्थापन-संघर्ष निवारण्यासाठी वापरण्यात येणारे तंत्र, 3.7 ताणतणाव व्यवस्थापन-तणाव व भिती कमी कशी करणा, 3.8 सामाजिक सलोखा/सुसंवाद व शांतीसाठी प्रयत्न, 3.9 निर्णय, 3.10 भावनिक बुद्धीमत्ता, 3.11 जीवनातील मृदू कौशल्य
- व्यवसाय नियोजन : 4.1 प्रास्ताविक, 4.2 वास्तववादी ध्येय निश्चिती, 4.3 वेळेचे व्यवस्थापन, 4.4 व्यवसाय नियोजन, 4.5 मुलाखतीला तोंड देण्याची कला, 4.6 मुलाखतीसाठी व्यक्तिमत्त्वात आवश्यक गुण, 4.7 व्यक्तीमत्व कसोट्यांचे आणि अभियोग्यता कसोट्यांचे महत्व