शाश्वतता आणि विकास
Sustainability and Development
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्या पूर्ण करणारा विकास म्हणजे शाश्वत विकास होय. शाश्वत विकासात चैनीच्या गरजा अंतर्भूत नसतात. शाश्वत विकासाची संकल्पना व्यापक असून त्यात सर्व व्यक्तींच्या कल्याणाची कल्पना अभिप्रेत आहे. या शाश्वत विकासात केवळ वर्तमान पिढीचे कल्याण नसून भावी पिढ्यांच्या कल्याणाकरिता नियोजन व व्यवस्थापनसुद्धा अंतर्भूत आहे. विकासाची पद्धत अशी असली पाहिजे की, तिच्यामुळे भावी पिढ्यांच्या गरजा भागविणार्या क्षमतेस ठेच पोहचायला नको; तर ती अबाधित राहिली पाहिजे. त्या क्षमतेस धोका निर्माण होता कामा नये. वर्तमान काळातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढ्यांच्या गरजांकडे लक्ष ठेवून उपयुक्त साधनसंपदा त्यांच्यापर्यंत कशी अबाधित राहिल याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे. असा विकास म्हणजेच शाश्वत विकास होय.
Shashwatata and Vikas
- परिचय : 1.1 (अ) चिरंतनतेची (शाश्वततेची) व्याख्या, (ब) विकासाची व्याख्या,
1.2 शाश्वततेचे घटक, (अ) पर्यावरणीय शाश्वसता, (ब) आर्थिक शाश्वसता, (क) सामाजिक शाश्वसता - सहस्त्रक/शतकोत्तर विकास ध्येये : 2.1 सहस्त्रक विकास लक्ष्ये – परिचय व अर्थ, 2.2 सहस्त्रक विकास ध्येये/शतकोत्तर विकास ध्येये अहवाल – 2015 (संयुक्त राष्ट्रसंघ), 2.3 भारत आणि सहस्त्रक विकास लक्ष्ये (राष्ट्रीय रणनिती), 2.4 सहस्त्रक विकास ध्येये/शतकोत्तर विकास ध्येये यांची साध्यता, परीणामकारकता व अपयश
- शाश्वत विकास : 3.1 शाश्वत विकासाची व्याख्या व स्वरूप, 3.2 शाश्वत विकासाची गरज, 3.3 शाश्वत विकासाची उद्दीष्टे, 3.4 विविध परिसंस्थामधील शाश्वत विकास – कृषी व वने परिसंस्था, 3.5 शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाची भूमिका, 3.6 स्वच्छ विकास यंत्रणा (तंत्र)
- समावेशक विकास : 4.1 उच्च शिक्षणाची शाश्वत विकासातील भूमिका, 4.2 आरोग्य आणि शाश्वत विकास, 4.3 गरीबी आणि आजार व शाश्वत विकास, 4.4 हवामान बदल नियंत्रणासाठी धोरणे व जागतिक सहकार्य, 4.5 राष्ट्रीय पर्यावरण धोरण, 4.6 रिओ +20