भौगोलिक माहिती प्रणाली
Geographical Information System
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
भौगोलिक माहिती प्रणाली ही भौगोलिक माहिती मिळवणारी, साठवणारी आणि त्याचे व्यवस्थापन करणारी प्रणाली आहे. अनेक विद्याशाखांतील संकल्पना व विचार यांचा अभ्यास करुन तयार केलेले तंत्र आहे. या तंत्रज्ञानामुळे विश्वाची भौगोलिकदृष्ट्या माहिती तंत्रज्ञानाबाबतची जवळीकता निर्माण झाली आहे. जीआयएस तंत्रज्ञानाची विलक्षण क्षमता व सहज वापरण्यायोग्य कार्यप्रणाली यामुळे हे तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या तंत्राचा वापर अनेक क्षेत्रात नियोजन, व्यवस्थापन, अभियांत्रिकी व अनेक दैनंदिन व्यवहारासाठी वाढत आहे. पर्यावरणीय, परिस्थिकीय, वातावरणीय आणि अनेक जैविक घडामोडी मध्ये जीआयएसचा वापर होत आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीच्या अनेक आज्ञावली आहेत. काही आज्ञावली मोफत उपलब्ध आहेत तर काही विकत घ्याव्या लागतात. गरजेनुसार आज्ञावलींंचा शोध घेवून त्यांचा सर्वसामान्यपणे वापर करता येतो. भौगोलिक विश्लेषणासाठी जीआयएस आज्ञावली वापरल्या जातात.
भौगोलिक माहिती प्रणाली अवकाशिक व गुणविशेष माहितीवर कार्य करते. या प्रणालीमध्ये जाळी सांख्यिकी व सदिश सांख्यिकी प्रतिमानात सांख्यिकी संकलित केली जाते.
भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन विविध क्षेत्रात प्रभावीपणे केले जाते.
Bhaugolik Mahiti Pranali
- भौगोलिक माहिती प्रणालीची तोंडओळख : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्याख्या, 1.3 भौगोलिक माहिती प्रणालीचा इतिहास, 1.4 भौगोलिक माहिती प्रणालीचे घटक, अ) संगणक संहिता, ब) आज्ञावली/कार्यवाही संहिता, क) सांख्यिकी-जाळी सांख्यिकी आणि सदिश सांख्यिकी, ड) वापरकर्ते, 1.5 भौगोलिक माहिती प्रणालीची कार्यपद्धती – अ) अभिक्षेत्रीय सांख्यिकी नोंदी, ब) गुणविशेष सांख्यिकीचे व्यवस्थापन, क) सांख्यिकी प्रदर्शन, ड) सांख्यिकी शोध, इ) सांख्यिकी पृथःकरण, ई) भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिकृती
- भौगोलिक माहिती प्रणालीतील सांख्यिकी संरचना : 2.1 भूअभिक्षत्रिय सांख्यिकीचे प्रकार, अ) अवकाशिक सांख्यिकी, ब) गुणविशेष सांख्यिकी/अ-अवकाशिक सांख्यिकी, 2.2 जाळी सांख्यिकीची संरचना, चौकोन, चित्रांश, जाळी, चौकोन आकार, अभिक्षत्रिय वियोजन किंवा अवकाशिय वियोजन, वर्णपट/चायनल, एकल आणि बहुपट्टे रचना, 2.3 सदिश सांख्यिकी संरचना, बिंदू घटक, रेषा घटक, प्रदेश घटक, 2.4 जाळी आणि सदिश सांख्यिकीचे उगमस्त्रोत, 2.5 जाळी आणि सदिश सांख्यिकीची निवड
- भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकीचे पृथःकरण : 3.1 जीआयएस सांख्यिकी नोंदणी, अ) अंक अक्षर पट्टीने नोंदणी, ब) मानवचलित अंकीय नोंद, क) सूक्ष्म समीक्षक आणि स्वयंचलित अंकीय नोंदणीकरण, ड) जीपीएस सांख्यिकी नोंदणी, 3.2 भूसंदर्भ, 3.3 सांख्यिकी संस्करण, 3.4 निर्गमन/बाह्यप्रवेश, 3.5 अध्यारोपण
- भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन : 4.1 भूमी उपयोजन आणि भूआच्छादन मोजणी, 4.2 नागरी विस्तार किंवा शहर विस्तार, 4.3 जंगल क्षेत्रातील देखरेख, 4.4 आपत्ती व्यवस्थापन, 4.5 संरक्षण क्षेत्र, 4.6 नैसर्गिक संपदा व्यवस्थापन