प्रतिशोध (नाटक)
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
हजारो वर्षांपासून या मातीत स्त्रियांचे बौद्धिक, मानसिक, शारीरिक अशा नानाविध पातळ्यांवर शोषण करणारी व्यवस्था अस्तित्वात आहे. ती कधी आबासाहेबांसारख्या वासनांध व्यक्तीच्या रुपानं तर कधी जाती-धर्माच्या रुपानं नांदत आलीय. मात्र स्त्री ही वेळोवेळी त्यांच्या वासनेला बळी गेली. तिला गुलाम ठरविणार्या व्यवस्थेचा आम्ही कडाडून विरोध केला पाहिजे. तिला समाजात, घरात सन्मानाने जगता येईल असं खरं तर वातावरण पुरुषवर्गांनी निर्माण करून दिलं पाहिजे.
तिच्या प्रत्येक पावलांना आम्ही आत्मविश्वासाचं बळ दिलं पाहिजे. तुमच्या-आमच्या नव्हे तर सार्यांच्याच निर्मितीचे ती उर्जाकेंद्र आहे. हे समजून तिच्या त्रिकालदर्शी कर्तृत्वाला सलाम करायला हवा. कारण या सृष्टीचे नंदनवन तिला समानतेने घेऊन चालण्यातच आहे. याशिवाय स्त्री-पुरुष समानतेसारख्या संकल्पना शून्यवत आहेत. अगदीच शून्यवत आहेत.
Pratishodh