19 व्या शतकातील महाराष्ट्र
Maharashtra in the 19th Century (S-4)
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
1818 मध्ये बाजीराव पेशवा हा इंग्रजांना शरण गेला व छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्प्रयासाने उभारलेले स्वराज्य संपुष्टात आले. त्याकाळी सामाजिक जीवनामध्ये जातीव्यवस्थेचे वर्चस्व वाढले होते. जातीव्यवस्था ही दृढ झाली होती. पेशवे काळामध्ये स्त्रीजीवन फारसे चांगले नव्हते. राजा राममोहन रॉय, म. फुले इ. सुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात सर्वांगीण सुधारणेस प्रारंभ झाला. समाजातील अनिष्ट प्रथांना मूठमाती दिली गेली. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांनी ज्ञान प्रसार आणि समकालीन घटनांना प्रसिद्धी देणे या दोन हेतूंनी समाजसुधारणेस हातभार लावला. ज्ञान आणि विज्ञानाचा परिचय सर्वसामान्यांना झाला. शिक्षणामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास होतो, याची समाजाला जाणीव झाली. इंग्रजांनी विविध मार्गांनी भारतीयांचे शोषण केले. याबाबत दादाभाई नौरोजी यांनी आर्थिक निःसारणाचा सिद्धांत मांडला. त्यामुळे भारताच्या दारिद्य्राचे खरे कारण कळाले. न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, म. गांधीजींसारख्या नेत्यांनी याविरुद्ध आवाज उठविला व भारतीयांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरणा दिली.
19 vya Shatakatil Maharashtracha Itihas
- महाराष्ट्रातील ब्रिटिश सत्तेचा पाया : 1.1 ब्रिटीशपूर्वकालीन महाराष्ट्रातील परिस्थिती, 1.1.1 राजकिय परिस्थिती, 1.1.2 सामाजिक परिस्थिती, 1.1.3 आर्थिक परिस्थिती, 1.1.4 धार्मिक परिस्थिती, 1.2 ब्रिटीशांचे प्रशासन, 1.3 ब्रिटीश सत्तेचा महाराष्ट्रावर झालेला परिणाम, 1.3.1 राजकिय परिणाम, 1.3.2 आर्थिक परिणाम, 1.3.3 सामाजिक व शैक्षणिक धोरण, 1.3.4 भारतीय वृत्तपत्रांचा विकास, 1.3.5 देशी वृत्तपत्रांचा प्रारंभ.
- महाराष्ट्रातील सुधारणा : 2.1 विचारवंतांचे कार्य, 2.1.1 बाळशास्त्री जांभेकर (1812-1846), 2.1.2 जगन्नाथ शंकरशेठ (1803-1865), 2.1.3 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख (1823-1892), 2.1.4 महात्मा ज्योतिबा फुले (1827-1890), 2.2 सुधारणेसाठी संस्थात्मक प्रयोग, 2.2.1 परमहंस सभा/मंडळी (इ.स.1840), 2.2.2 प्रार्थना समाज (इ.स.1867), 2.2.3 सत्यशोधक समाज (इ.स.1873), 2.2.4 सार्वजनिक सभा (इ.स.1870).
- ब्रिटीशाविरुद्ध उठाव आणि राष्ट्रवादी आंदोलने : 3.1 स्थानिक उठाव, 3.1.1 सन 1857 चा उठाव, 3.1.2 भिल्लांचे बंड, 3.1.3 कोळ्यांचे बंड, 3.1.4 रामोश्यांचे बंड, 3.1.5 कच्छमधील उठाव, 3.1.6 सूरतचे मीठ आंदोलन, 3.1.7 वाघेऱ्यांचे बंड, 3.1.8 सन 1857 चा उठाव व खानदेश, 3.1.9 दख्खनचे दंगे (इ.स.1875), 3.2 राष्ट्रीय सभेचा उदय (जहाल आणि मवाळ).
- महाराष्ट्रातील आर्थिक परिवर्तन : 4.1 आर्थिक शोषण, 4.2 महसूल : रयतवारी पध्दती, 4.3 शेतीचे व्यापारीकरण, 4.4 आर्थिक विचार आणि विचारवंत.