Prashant Publications

My Account

आधुनिक राजकीय विश्लेषण

Modern Political Analysis (G-3)

Authors: 

ISBN:

SKU: 9789391391638
Marathi Title: Adhunik Rajkiya Vishaleshan
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 288
Edition: First

325.00

  • DESCRIPTION
  • INDEX

आधुनिक विश्लेषणाची सुरूवात जरी द्वितीय महायुद्धानंतरच्या काळात मानली जात असली तरी त्यापूर्वी पारंपारिक राजकीय विश्लेषणाचे विविध दृष्टिकोनातून अध्ययन केले जात होते. विश्लेषकणकर्त्यांनी तत्कालीन समाजाची आवश्यकता म्हणून राजकीय विश्लेषण केलेले आढळते. उद्देशात्मक स्वरुपाचा व तत्कालीन राजकीय समाजाचे पर्यावरण व समस्या आधुनिक राजकीय समाजाचे पर्यावरण व समस्या यांच्यात फरक असल्याने पारंपारिक व आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या स्वरुपात फरक असल्याचे आढळते. पारंपारीक राजकीय विश्लेषणाने खऱ्या अर्थाने आधुनिक राजकीय विश्लेषणाला विशिष्ट स्वरुपात प्रस्तुत करण्यासाठी व विशिष्ट दिशेने अध्ययन करण्यासाठी मार्ग दाखविला.
प्रस्तुत पुस्तकात राजकीय विश्लेषणासंदर्भात व विविध राजकीय संकल्पना, पारंपारिक व आधुनिक राजकीय विश्लेषण : राजकीय व्यवस्था, राजकीय संस्कृती, राजकीय सामाजीकरण, राजकीय सहभाग, राजकीय अभिजन, राजकीय संसूचन, शक्ती, सत्ता, प्रभाव, अधिमान्यता संदर्भात विस्तुत आढावा घेण्यात आहे. अभ्यासकांना सखोल व विस्तृत स्वरुपात ज्ञान प्राप्त करुन देण्याच्या दृष्टीने प्रस्तुत पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.

Adhunik Rajkiya Vishaleshan

  1. पारंपारिक व आधुनिक राजकीय विश्लेषण : परीचय : 1.1 पारंपारिक राजकीय दृष्टीकोन व आधुनिक राजकीय दृष्टीकोन यांच्यातील फरक, 1.2 पारंपारिक राजकीय दृष्टीकोन, 1.3 आधुनिक राजकीय दृष्टीकोन, 1.4 पारंपारिक राजकीय विश्लेषण, 1.5 आधुनिक राजकीय विश्लेषण.
  2. राजकीय व्यवस्था : 2.1 राजकीय व्यवस्था अर्थ व व्याख्या, 2.2 राजकीय व्यवस्थेची वैशिष्टे, 2.3 राजकीय व्यवस्थेची लक्षणे, 2.4 राजकीय व्यवस्थेचे कार्य, 2.5 गॅब्रीयल आल्मंडचे राजकीय व्यवस्थेचे वर्गीकरण, 2.6 राजकीय व्यवस्था संकल्पनेचे महत्व.
  3. राजकीय संस्कृती : 3.1 राजकीय संस्कृती अर्थ व व्याख्या, 3.2 राजकीय संस्कृतीचे घटक, 3.3 राजकीय संस्कृतीचे स्वरूप, 3.4 राजकीय संस्कृतीची मुलतत्वे, 3.5 राजकीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, 3.6 राजकीय संस्कृतीचे आधारभूत तत्वे, 3.7 राजकीय संस्कृतीत परिवर्तन करणारे घटक, 3.8 राजकीय संस्कृतीचे प्रकार, 3.9 राजकीय संस्कृतीचे आयाम किंवा पैलू, 3.10 राजकीय संस्कृतीचे नियामक तत्व, 3.11 राजकीय संस्कृतीचे महत्व.
  4. राजकीय सामाजीकरण : 4.1 राजकीय सामाजीकरण अर्थ व व्याख्या, 4.2 राजकीय सामाजीकरणाचे स्वरूप व वैशिष्ट्ये, 4.3 राजकीय सामाजीकरणाचे परीवर्त्य, 4.4 राजकीय सामाजीकरणाचे स्तर व प्रक्रिया, 4.5 राजकीय सामाजीकरणाचे प्रकार, 4.6 राजकीय सामाजीकरणाचे साधने, 4.7 राजकीय सामाजीकरणाचे निर्धारक तत्वे, 4.8 राजकीय सामाजीकरणाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी, 4.9 राजकीय सामाजीकरणाचे महत्व.
  5. राजकीय सहभाग : 5.1 राजकीय सहभाग अर्थ व व्याख्या, 5.2 राजकीय सहभागाचे स्वरूप व वैशिष्टे, 5.3 राजकीय सहभागाचे सिद्धात, 5.4 राजकीय सहभागाचे प्रकार, 5.5 राजकीय सहभागाचे पैलू किंवा क्रिया, 5.6 राजकीय सहभागाच्या शैली, 5.7 राजकीय सहभागाचे आधारभूत तत्वे, घटक किंवा परिवर्त्य, 5.8 राजकीय सहभागाचे महत्व.
  6. राजकीय अभिजन : 6.1 राजकीय अभिजन अर्थ व व्याख्या, 6.2 अभिजनाची वैशिष्ट्ये, 6.3 राजकीय अभिजनाचे प्रकार, 6.4 राजकीय अभिजनाचे स्वरूप, 6.5 राजकीय अभिजनाचे उद्दिष्टे व कार्ये, 6.6 अभिजन वर्गाचे सिद्धांत, 6.7 अभिजन संकल्पना व लोकतंत्र संबंध, 6.8 राजकीय अभिजनाचे महत्त्व.
  7. राजकीय संसूचन : 7.1 राजकीय संसूचन अर्थ व व्याख्या, 7.2 राजकीय संसूचनाचे स्वरूप, 7.3 राजकीय संसूचनाची वैशिष्टे, 7.4 राजकीय संसूचनाची अभिकरणे, 7.5 लोकतांत्रिक राजकीय संसूचनाचा उद्देश्य, 7.6 राजकीय संसूचन साधनांची कार्ये, 7.7 कार्ल डायशचे संसूचन प्रतिमान, 7.8 राजकीय संसूचनाचे महत्व.
  8. शक्ती : 8.1 शक्ती अर्थ व व्याख्या, 8.2 शक्तीचे स्वरुप किंवा वैशिष्टे, 8.3 शक्तीचे स्त्रोत, 8.4 शक्तीचे प्रकार, 8.5 शक्तीचा वापर करण्याच्या पद्धती किंवा साधने, 8.6 शक्तीसंबंधी विविध विद्वानांची मते, 8.7 शक्ती प्राप्तीचा उद्देश्य, 8.8 शक्ती व सत्ता, 8.9 शक्ती व प्रभाव, 8.10 शक्ती वापरावरील मर्यादा, 8.11 शक्तीचे महत्व.
  9. सत्ता : 9.1 सत्ता, अर्थ व व्याख्या, 9.2 सत्तेचे स्वरूप किंवा वैशिष्टे, 9.3 सत्तेचे स्त्रोत, 9.4 सत्तेची तत्वे किंवा घटक, 9.5 सत्तेचे कार्ये, 9.6 सत्तेचे आधार किंवा स्वीकृती, 9.7 सत्तेचे प्रकार, 9.8 सत्तेविषयी दृष्टीकोन, 9.9 सत्तेचे पालन करण्याची कारणे, 9.10 सत्तेचे महत्व.
  10. प्रभाव : 10.1 प्रभाव, अर्थ व व्याख्या, 10.2 प्रभावाची वैशिष्टे, 10.3 प्रभावाचे स्वरूप, 10.4 प्रभावाचा उद्देश्य, 10.5 प्रभावाचे दृष्टीकोन, 10.6 प्रभावाचे मापन, 10.7 प्रभावाचे स्त्रोत, 10.8 प्रभावाच्या विश्लेषणाची समस्या, 10.9 प्रभावाचे महत्व.
  11. अधिमान्यता : 11.1 अधिमान्यता अर्थ व व्याख्या, 11.2 अधिमान्यतेची वैशिष्टे, 11.3 अधिमान्यतेचे प्रकार, 11.4 अधिमान्यतेचे आधार, 11.5 अधिमान्यता प्राप्तीची साधने, 11.6 अधिमान्यतेचे स्त्रोत, 11.7 अधिमान्यतेचे संकट, 11.8 अधिमान्यतेचे महत्व, 11.9 शक्ती, सत्ता व अधिमान्यता : संबंध.
RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक राजकीय विश्लेषण 325.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close