समाजशास्त्र : परिचय व मूलाधार
Introduction and Foundations of Sociology
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे. शारीरिक गरजांच्या सोबतच त्याला मानसिक व भावनिक गरजांची पुर्तता करावी लागते. मानवाचे सामाजिक संबंध हे अत्यंत क्लीष्ट किंवा गुंतागुंतीचे असतात. ह्या संबंधांचे स्वरूप स्थिती व कालसापेक्ष स्वरूपात आढळून येते. विविध संकल्पनांमुळे आपणास त्या घटकाचे सूक्ष्म व समग्रज्ञान आत्मसात होते. नैसर्गिक वा भौतिक शास्त्रांप्रमाणेच सामाजिक शास्त्रातही संकल्पनांचा वापर केला जातो. जगाच्या पाठीवरील प्रत्येक समाजाला स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती असते. बाह्य वातावरण व संस्कृती यांचे व्यक्तीच्या मनावर सतत संस्कार होत असतात. जन्म, मृत्यू आणि विवाह या मानवी जीवनातील महत्वपूर्ण घटना मानल्या जातात. व्यक्ती कुटुंबात जन्म घेते व कुटुंब मानव प्राण्याचे सामाजिक प्राण्यात रुपांतर करते. जगभरातील प्रत्येक समाजात धर्माचे अस्तित्व आढळून येत असते. समाजाचे स्वरूप हे व्यक्तींच्या साधर्म्यातून तयार होते. सामाजिक संबंधांच्या आंतरक्रियेतून समाजव्यवस्थेची निर्मिती होत असते. सामाजिक संरचनेच्या घटकात नेहमी रचनात्मक व कार्यात्मक बदल होत जातो.
Samajshastra Parichay Aani Muladhar
- समाजशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती : 1.1 समाजशास्त्राचा उदय व विकास, 1.2 समाजशास्त्र : अर्थ आणि स्वरूप, 1.3 समाजशास्त्राचा अभ्यासविषय किंवा व्याप्ती, 1.4 समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व.
- समाजशास्त्रीय मुलभूत संकल्पना : 2.1 समाज : अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.2 संस्था : अर्थ आणि वैशिष्ट्ये, 2.3 सामाजिक संरचना : अर्थ व घटक, 2.4 सामाजिक गट/समूह : अर्थ आणि प्रकार : प्राथमिक व दुय्यम.
- संस्कृती आणि सामाजिकरण : 3.1 संस्कृती : अर्थ आणि वैशिष्ट्ये, 3.2 संस्कृतीचे घटक : सांस्कृतिक सापेक्षवाद, 3.3 सामाजिकरण : अर्थ आणि साधने, 3.4 सामाजिकरणाचे उद्देश.
- सामाजिक संस्था : 4.1 कुटुंब संस्था : अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार : संयुक्त आणि केंद्रीय, 4.2 विवाह संस्था : अर्थ आणि प्रकार (एकविवाह, बहूविवाह), 4.3 धर्म संस्था : अर्थ, वैशिष्ट्ये आणि कार्ये, 4.4 नातेसंबंध व्यवस्था : अर्थ आणि वैशिष्ट्ये.
- सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक गतिशिलता : 5.1 सामाजिक स्तरीकरण : अर्थ आणि वैशिष्ट्ये, 5.2 सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार : बंद आणि खुले, 5.3 सामाजिक गतिशीलतेचा अर्थ, 5.4 सामाजिक गतिशीलतेचे प्रकार.
- सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक बदल : 6.1 सामाजिक नियंत्रण : अर्थ आणि स्वरूप, 6.2 सामाजिक नियंत्रणाची साधने : औपचारिक व अनौपचारिक, 6.3 सामाजिक परिवर्तन : अर्थ आणि घटक, 6.4 सामाजिक परिवर्तनातील अडथळे.