आधुनिक विपणन तंत्र
Modern Marketing Technique
Authors:
ISBN:
₹235.00
- DESCRIPTION
- INDEX
विपणन हे व्यवसायाचे एक कार्य आहे. आजच्या जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण यामुळे बाजारपेठ क्षेत्र आंतरराष्ट्रीय झाले आहे. बाजारपेठ क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. बाजारपेठेत सर्वत्र असंख्य ग्राहक विखुरलेले असतात. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा सारख्या नसतात. खरेदीदाराची वर्तणूक एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. प्रमाणित वस्तू जीवन चक्रामध्ये प्रवर्तन, विकास, परिपक्व आणि समाप्ती अशा चार अवस्था आहे. नेटवर्क विपणनात काम करणारे सर्व व्यक्ती एक दुसऱ्यासोबत साखळीसारखे जोडलेले असतात. आज जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मानवी जिवनाच्या विविध क्षेत्रात केला जात आहे. बाजारपेठेत विविध कंपन्यांच्या व नाना तऱ्हेच्या आकर्षक वस्तू येऊ लागल्यामुळे स्पर्धेचे स्वरूप तीव्र होऊ लागले. वस्तू आणि सेवेचे विपणन गतीमान करण्यासाठी माहितीचा देवाण-घेवाणासाठी परंपरागत माध्यमाचा वापर न करता आधुनिक माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या सोशल मीडियाचा वापर करतात.
Andhunik Vipanan Tantre
- विपणनाची ओळख : 1.1 विपणन : अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.2 व्यवसाय कार्य म्हणून विपणनाचे महत्त्व, 1.3 विपणन प्रक्रिया, 1.4 विपणन नैतिक मूल्ये/नीतिमूल्ये, 1.5 विपणनाची कार्ये, 1.6 ग्रामीण आणि हरित विपणन : अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये.
- बाजारपेठ प्रभागीकरण आणि खरेदीदाराची वर्तणूक : 2.1 बाजारपेठ प्रभागीकरण, 2.1.1 प्रभागीकरण : अर्थ, संकल्पना आणि महत्त्व, 2.1.2 उपभोक्ता बाजारपेठ प्रभागीकरणाचे आधारभूत घटक, 2.1.3 बाजारपेठ विभागीकरणाचे फायदे/तोटे, 2.2 खरेदीदार/उपभोक्ता वर्तन, 2.2.1 खरेदीदाराच्या वर्तनाचा अर्थ, 2.2.2 उपभोक्ता/खरेदीदाराच्या वर्तनावर परिणाम करणारे घटक, 2.2.3 उपभोक्ता वर्तनासंबंधी सिद्धान्त, 2.2.4 खरेदी निर्णय प्रक्रिया : 5-स्टेज मॉडेल.
- विपणन मिश्र : 3.1 विपणन मिश्र : प्रस्तावना, 3.2 विपणन मिश्र : पारंपारिक 4पीएस घटक, 3.3 विपणन मिश्रचे आधुनिक घटक – अतिरिक्त 3पीएस, 3.4 प्रभावी विपणन मिश्रचा विकास.
- वस्तू जीवन चक्र आणि विपणन रणनिती : 4.1 वस्तू जीवन चक्र, 4.2 विपणन रणनीती : प्रवर्तन (परिचय) अवस्था, 4.3 विपणन रणनीती : विकास अवस्था, 4.4 विपणन रणनीती : परिपक्व अवस्था, 4.5 विपणन रणनीती : समाप्ती अवस्था.
- नेटवर्क विपणन : 5.1 अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, 5.2 नेटवर्क विपणन प्रक्रिया, 5.3 नेटवर्क विपणनाचे फायदे, 5.4 नेटवर्क विपणनाचे तोटे, 5.5 नेटवर्क विपणनातील समस्या, 5.6 नेटवर्क विपणनातील नितीतत्त्वे, 5.7 बहुस्तरीय किंवा विविध पातळी विपणनाचे स्वरूप.
- बाजारातील सध्याचे प्रवाह : 6.1 क्लाऊड मार्केटिंग, 6.2 ड्रीप मार्केटिंग, 6.3 ई-मेल मार्केटिंग, 6.4 फ्री बाय मार्केटिंग, 6.5 मोबाईल मार्केटिंग, 6.6 न्यूज लेटर/बातमी पत्राधारित मार्केटिंग, 6.7 ऑनलाईन मार्केटिंग, 6.8 सोशियल मेडिया मार्केटिंग.
Related products
-
विपणन आणि जाहिरात
₹195.00