‘देव' माणसं अन् ‘गुणी' लेकरं
...जोडू ‘जिव्हाळ्याचं' नातं, अभ्यासासह घर, समाजाशी!
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
भाग : 2 – चंदाकाकांची वही
सहज संवाद…सर्वांच्या भल्यासाठी!
सूर्यकांत अन् त्याची प्रेमळ, कष्टाळू, मेहनती ‘टोळी’…
अनेकोत्तम आशीर्वाद!
सूर्यकांत मला भेटला. खूप गप्पा झाल्या. आनंद वाटला. ‘टोळी’बद्दल त्याने जे जे सांगितलं ते ऐकून खूप समाधान वाटलं. असो.
बालगोपाळांसाठी तसेच छोट्या-मोठ्यांसाठी मी काही लिहून ठेवलेय. ते सारं मी तुम्हाला देतोय. ते तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वाचावं. त्याचं मनन करावं वा त्यावर चर्चा करावी. जिथे मदत लागेल तिथे विनयसर आहेतच.
छोट्या दोस्तांनो, विनयसरांसारखी शिक्षकमंडळी अन् आईबाबा वा अनुभवी माणसं तुमच्या आसपास बोलायला, सांगायला, मार्गदर्शन करायला, शाबासकी द्यायला आहेत, ही किती मोठी व महत्त्वाची गोष्ट आहे.
असो. एकेक पान मन लावून, तेही मोठ्याने वाचा. वेळ मिळेल तेव्हा मला प्रत्यक्ष भेटा वा फोन करत माझ्याशी गप्पा मारा.
सर्वांना सर्व कामांसाठी शुभेच्छा, आशीर्वाद
तुमचा,
चंदाकाका
(टीप : काही गोष्टी मराठीत, हिंदीत आहेत तर काही इंग्रजीत. आणि हो, जे ‘खास पालकांसाठी’ म्हणून लिहिलेय ते त्यांना अवश्य वाचायला द्या. लेखच नव्हे तर पूर्ण पुस्तक त्यांना वाचू द्या. कळलं?)
Dev Manas An Guni Lekar