असहमतीचे रंग
Authors:
ISBN:
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
अशोक नामदेव पळवेकर यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवाची एक प्रगल्भ कालसंहिता आहे.
भारतीय समाजव्यवस्थेतील आजचे वास्तव मांडताना ही कविता सभोवतालच्या सामान्य माणसांच्या जगण्यातील ताण-तणावांसोबतच समाजातील धार्मिक-जातीय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुषसत्ताक हिंस्रता आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीशांच्या वर्तनातील सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचारसरणीतून फोफावत जाणारा धार्मिक-सांस्कृतिक उन्माद व कट्टरतावाद इत्यादींच्या आत्यंतिक प्रभावाखाली उद्ध्वस्त होत जाणारी लोकशाही यंत्रणेतील सामाजिक व मानवी मूल्ये; तसेच भांडवली आक्रमकता, सत्ताशरण माध्यमे-प्रशासन-न्याययंत्रणा वगैरेंची वेगवेगळी वास्तवरुपेही अत्यंत उग्र व आक्रमक स्वरुपात आपल्या स्वतंत्र शैलीने अभिव्यक्त करते.
आंबेडकरवादी जीवनदृष्टीतील संवेद्यता ही या कवितेची प्रकृती असून विश्वमानवतावादाच्या व्यापक परिघ-केंद्राशी या कवितेची नाळ जुळलेली आहे. त्यामुळेच ही कविता सभोवतालच्या मानवी दुःखजाणिवांशी अगदी सहजीभावाने एकरुप होते; आणि न्याय-अन्यायाच्या टोकदार संघर्षात न्यायाच्या बाजूने आपली निर्णायक भूमिका जाहीर करते. विवेकशील लढवय्येपण हा या कवितेचा एक महत्त्वाचा पैलू असल्याने मानव्यपातळीवरील विश्वसंवेदना व जीवनजाणिवांचे ऐतिहासिक संचित या कवितेतून अव्याहतपणे प्रवाहित होताना दिसते; आणि सामाजिक दुःख जाणिवेचे एक कारुण्यमय व विद्रोही दर्शन त्यातून प्रगल्भपणे साकार होते.
या कवितेतील तत्त्वचिंतन आणि समकालीन वास्तवाचे एकूणच भान लक्षात घेता ही कविता म्हणजे आपल्या समकाळाच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणातील अत्यंत कडवट व उष्ण रंग दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या स्थितिगतीच्या कालकल्लोळाचा एक मौलिक ऐवज आहे.
Asahmatiche Rang
- काळ नसतो बदलत कधी!
- मी, जाहीर केलाय् ईश्वराचा मृत्यू!
- ओ, जीनिअस!
- कालाय् तस्मै नम:
- पाहोम
- ‘पारधी, कबुतर आणि मुंगी’ यांच्या कथेविषयी…
- गावात आलेल्या मदाऱ्याची गोष्ट!
- राजकारण
- पडझड
- दे आर टोटली मिस्फिट फॉर दॅट!
- प्रतिज्ञा
- प्रयोग : अर्थात, कोण पेटवतोय देश?
- जंतरमंतर
- काय, चाललंय काय, या देशात?
- हा देश विकणे आहे!
- लाल किल्ल्यावरून…!
- सत्तांतर
- सत्तेच्या कासवाचे कवच!
- लोकशाही
- एन्काऊंटर!
- युद्धोन्माद!
- युद्धविराम
- एका प्रवासातली गोष्ट!
- गूघाणीच्या राजकारणातली नौटंकी!
- पंचकुला : 25 ऑगष्ट 2017
- भुलभूलैय्या!
- पाठलाग
- मेक इन इंडिया : नालासोपारा
- मॉब लिंचिंग!
- सलमान भाय!