समकालीन साहित्य मीमांसा
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
साहित्यकृती ही विशिष्ट वाङ्मयप्रकारांतर्गत आविष्कृत होत असली तरी तिची म्हणून काहीएक स्वायत्तता असते. म्हणूनच अनेक अंगाने तिचे विश्लेषण संभवते. अनेकानेक समीक्षा पध्दतीने साहित्यकृतीची मीमांसा शक्य आहे तथापि साहित्यकृतीचा आशय हा चिकित्सेचा गाभा आणि दिशा सूचित करतो. मीमांसकाने साहित्यकृतीच्या अंतरंगातील हे सत्व ओळखले की साहित्यकृतीचे वाङ्मयीन मूल्य आणि सौंदर्य उलगडता येते.
डॉ. वासुदेव वले यांनी विविध वाङ्मयप्रकारातील लक्षवेधी साहित्यकृतींचा असाच सामर्थ्यशाली आढावा या ग्रंथात घेतला आहे. प्रथितयश साहित्यिकांच्या साहित्याची ही ‘समकालीन साहित्य मीमांसा’ सर्जनशील तर आहेच पण आस्वादाच्या रसरशीतपणाचा प्रत्यय देणारीही आहे. डॉ. वासुदेव वले यांनी या समीक्षाग्रंथातून आपला वेगळा मीमांसक दृष्टिकोन अभ्यासकांसमोर ठेवला आहे. तो लक्षणीय आणि म्हणून महत्त्वाचा आहे.
– प्रा. डॉ. मनोहर जाधव
मराठी विभाग प्रमुख/अधिष्ठाता मानव्य विद्या/
प्रमुख- डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
Samkalin Sahitya Mimansa
- समकालीन तरूणाईचे वास्तव चित्रित करणारा : उंबरा
- शेतमजुरांच्या जीवनवास्तवाचे चित्रण करणारे खंडकाव्य : चंद्रास्त
- मानवी मनाच्या वाताहतीचे शब्दशिल्पे
- ग्रामजीवन जाणिवांचे समर्थ चित्रण : व्यवस्थेचा बईल
- स्वानुभवाची काव्यात्म अभिव्यक्ती : बीजवाई
- जगणे शिकविणाऱ्या अनुभवांची ‘शिदोरी’
- कृषीजीवनातील दाहकतेची अभिव्यक्ती : ढासळल्या भिंती
- प्रेम जाणिवेचा काव्यात्म बहर : ऋतूपर्व
- समाज परिवर्तनाचा ध्यास बाळगणारी कविता : माझा हयातीचा दाखला
- नवविज्ञानाची कास धरणारी कविता : ठिगळ आणि टाके
- समताधिष्ठीत समाजरचनेची पाईक कविता : प्रारंभ
- ‘किरवंत’ नाटकातील विचारसंघर्ष
- ‘बामनवाडा’ नाटकातील जातिनिर्मूलनाचा विचार
- साक्षीपूरम नाटक : धर्मांतराची प्रेरणा
- अशोक कोळी यांचे साहित्य : कृषिजीवनाचे वास्तववादी चित्रण
- ‘नटरंग’ : एक नेटकं आणि देखणं माध्यमांतर
- साहित्याचा स्त्रोत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- दलित आत्मकथनांमधील सामाजिक जाणीव
- दलित कवयित्रींच्या कवितेतील सामाजिक जाणीव
- ‘बेट बंद भावनेचे’ : प्रेमानुभवाची काव्यात्म अभिव्यक्ती