कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट
Family Resources Management and Interior Decoration
Authors:
ISBN:
₹525.00
- DESCRIPTION
- INDEX
गृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.
Kautubik Sansadhanache Vyavsthapan V Antarik Sajawat (Part 1)
1. गृहअर्थशास्त्राचा परिचय :
1.1 गृहअर्थशास्त्राचा परिचय व इतिहास
1.2 गृहअर्थशास्त्राच्या परिभाषा, अर्थ व व्याप्ती
1.3 गृहअर्थशास्त्राच्या शाखा
i) गृहव्यवस्थापन ii) आहार व पोषण iii) वस्त्रशास्त्र आणि परिधान
iv) मानवविकास v) विस्तार शिक्षण vi) उपभोक्ता ग्राहक अर्थशास्त्र
vii) विवाह आणि कौटुंबिक संबंध
1.4 गृहअर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानाचे रोजगार आणि स्वयंरोजगारात योगदान
2. गृहव्यवस्थापन आणि कौटुंबिक संसाधने :
2.1 गृहव्यवस्थापनाची परिभाषा, अर्थ आणि महत्व
2.2 गृहव्यवस्थापनाची प्रक्रिया : नियोजन, नियंत्रण, मूल्यांकन
2.3 कौटुंबिक संसाधनाचे प्रकार
2.4 गृहव्यवस्थापकाचे गुण :
i) बुद्धिमत्ता ii) कल्पनाशक्ती iii) कुशलता iv) उत्साह व प्रेरणा
v) प्रामाणिकपणा vi) आदर्श (संयोजकता)
3. निर्णय घेणे :
3.1 निर्णय घेणे परिभाषा व अर्थ
3.2 निर्णय प्रक्रियेच्या पायऱ्या
3.3 निर्णय प्रक्रियेचे प्रकार
3.4 कौटुंबिक अंदाजपत्रक : संकल्पना आणि अर्थ,
अंदाजपत्रकाचे घटक : (गृहनिर्माण, घरगुती खर्च, वाहतूक, विमा, औषध आणि आरोग्य, शिक्षण, बचत इत्यादी)
4. रंग व रंगयोजना :
4.1 रंगाचे वर्गीकरण
i) प्राथमिक ii) द्वितीय iii) माध्यमिक iv) तृतीय v) चतुर्थ
vi) रंगचक्र
4.2 संबंधित आणि विरोधी रंग योजना
4.3 पुष्परचनेच्या परिभाषा आणि महत्व
4.4 पुष्परचनेचे प्रकार
i) जपानी ii) पारंपारिक iii) शुष्क पुष्परचना iv) समुहबद्ध पुष्परचना
5. कार्यक्रम व्यवस्थापन :
5.1 कार्यक्रम व्यवस्थापन : आधुनिक काळातील संकल्पना आणि व्याप्ती
5.2 कार्यक्रम व्यवस्थापनाचा रोजगार आणि स्वयंरोजगाराचा नवीन कल.
5.3 कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार : घरगुती आणि व्यावसायिक
5.4 कार्यक्रम व्यवस्थापन प्रणालीचा विकास
अ) मुलभूत बांधणी, जाहिरात, विपणन
ब) ठोस : कार्यक्रमव्यवस्था, अंदाजपत्रक, देखरेख, नोंद करणे, पेमेंट पद्धती, सेवा, सजावट, आदरातिथ्य इत्यादी.
6. प्रात्यक्षिक :
1) रंग योजना
2) रंगचक्र
3) ग्रीटींग तयार करणे
4) फुलांच्या प्रकाराची ओळख/परिचय
5) पुष्परचना साहित्याची ओळख/परिचय
6) कृतीशील पुष्परचना
7) पुष्परचना
8) फुलांची सजावट
9) फुलांच्या शॉपला भेट
10) फुलांच्या प्रदर्शनाला भेट
11) रंगोळी योजना कृतीशीलता
7. कुटूंबनिवास :
7.1 कुटूंबनिवासाची संकल्पना आणि महत्व
7.2 घराच्या जागेच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक
i) जमिनीचा प्रकार, ii) जागेची किंमत, iii) घराचे स्थान,
iv) आरोग्यवर्धक घटक, v) कायदेशीर बाबी, vi) उपलब्ध सोयी
7.3 गृहयोजनेची तत्वे
i) घराची अभिमुखता, ii) प्रशस्तपणा, iii) प्रकाश व वायुवीजन,
iv) एकत्रीकरण, v) एकांतता, vi) परिचलन, vii) स्वच्छता
7.4 पाणी पुर्नभरण (जलसंधारण) आणि घरगुती कचऱ्याची विल्हेवाट.
8. कार्यसरलीकरण :
8.1 कार्यसरलीकरण
8.2 कार्यसरलीकरणाची तत्वे
8.3 मुंडेलचे परिवर्तनाचे वर्ग
8.4 घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र
9. फर्निचर :
9.1 फर्निचरचे प्रकार
9.2 फर्निचर निवडीवर परिणाम करणारे घटक
9.3 पडदे आणि गालीचे
9.4 अद्ययावत स्वयंपाक घर
10. अंतर्गत सजावट :
10.1 अंतर्गत सजावटीच्या व्याख्या आणि व्याप्ती
10.2 अंतर्गत सजावटीची संकल्पना आणि नोकरी व्यवसाय
10.3 अंतर्गत सजावटीची मुलभूत वैशिष्ट्ये
i) साधेपणा, ii) शांतता, iii) प्रशस्तता, iv) उपयोगिता, v) मान्यता/संमती
10.4 अंतर्गत सजावटीची तत्वे
i) संतुलन, ii) लय, iii) प्राधान्य, iv) तफावत/संगती, v) प्रमाणबद्धता
11. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी :
11.1 गृहअर्थशास्त्रात रोजगार संधी
11.2 गृहअर्थशास्त्रात स्वयंरोजगार संधी
11.3 स्वयंरोजगाराची मार्गदर्शक तत्वे
11.4 जिल्हा उद्योग केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळची महिला सक्षमीकरणातील भूमिका
12. प्रात्यक्षिक :
1) रंगसंगती
2) ब्लॉकचा परिचय
3) लॉक प्रिंटींगसाठी रंगाचा परिचय
4) ब्लॉक प्रिंटींग प्रात्यक्षिक
5) ब्लॉक प्रिंटींग कुटीर उद्योगाला भेट
6) ब्लॉक प्रिंटींग नमुना तयार करणे.
7) टेबल क्लॉथ नमुना तयार करणे.
8) उशाच्या आवरणाचा नमुना तयार करणे.
9) ब्लॉक प्रिंटींग वापरुन स्कार्फ नमुना तयार करणे.
10) ब्लॉक प्रिंटींग लेखाचे डिझाईन
11) कार्पेट डिझाइनचे प्रात्यक्षिक
12) कार्पेट प्रकार व त्याची आकृतीबंध
13) कागदाच्या रेखांकनावर कलेच्या तत्वाचा वापर
14) व्यावहारिक प्रदर्शन