खानदेस रतन
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
स्तंभलेखन : गावकरी, पुण्यनगरी, आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात अहिराणी व मराठीत स्तंभलेखन. “गावकरी” मध्ये सन 1995 पासून सतत 5/6 वर्षे “आप्पान्या गप्पा” हे अहिराणी सदर चालविले. ते लोकप्रिय झाल्यामुळे आप्पान्या गप्पाकार ही ओळख मिळाली. आपला महाराष्ट्र मध्ये देखील मधुर वैंजी, गयामाय ही कथारुप व्यक्तिचित्रे व ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा यातील काही भागांचे अहिराणीत अनुवाद प्रसिद्ध. पुण्यनगरीत “मायन्यान भो” हे सदर एक दिड वर्षे चालविले. त्यातून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. चोखंदळ वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयातून देखील अहिराणी प्रचाराचे काम सुरु आहे.
अहिराणी साहित्य : आप्पान्या गप्पा भाग1 व 2 अहिराणी ललित लेखांची पुस्तके व पुरणपोळी कविता संग्रह प्रसिद्ध. “खानदेस रतन” हे पुस्तक आता प्रकाशित करत आहे. त्यात स्वातंत्र्य चळवळीतील महान विभूती, लेखक, कवी, समाजसेवक, राजकारणी यांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. खानदेस रतन भाग 2 देखील लवकरच प्रकाशित होईल. अहिराणीत आत्मवृत्त लिहीण्याचे काम चालू आहे.
अहिराणी प्रचार प्रसार : कासारे, चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात परिसंवादात अहिराणीतून भाषण करुन इतरांनाही अहिराणीतूनच बोलण्याचा आग्रह केला. आजपर्यंत झालेल्या सर्व अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनांचा वृत्तांत लिहून व्रुत्तपत्रात प्रसिद्ध केला. तसेच चाळीसगांव अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमेश सूर्यवंशी यांची मुलाखत घेऊन प्रसिद्ध केली.
अहिराणी त्रैमासिक : मायबोली अहिराणीच्या प्रचार प्रसारासाठी तसेच अहिराणीत लिहू इच्छीणाऱ्या नवोदित हातांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रा.डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्या सहकार्याने “खान्देशनी वानगी” हे त्रैमासिक जाने. 2016 पासून सुरु केले आहे. मायमावलींचे अलिखीत साहित्यही त्यात प्रसिद्ध केले जाते.
मराठी साहित्य : गंधाळलेली कविता हा काव्यसंग्रह व एक चारोळी संग्रह प्रसिद्ध
सामाजिक कार्य : व्यसनमुक्ती, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा निर्मूलन, व्रुक्ष लागवड व संवर्धन आदि चळवळीत सक्रिय सहभाग.
Khandes Ratan
- खानदेस रतन – क्रांति सेनानी डॉ. उत्तमराव पाटील
- खानदेस रतन – ‘क्रांतिइरांगना’ लिलाताई उत्तमराव पाटील
- खानदेस रतन – महालींगदास आहिरराव
- खानदेस रतन – महाराजा सयाजीराव गायकवाड
- खान्देश रतन – देव मामलेदार / यशवंत महाराज
- खान्देश रतन – नंदुरबारना सपुत शहिद शिरीषकुमार
- खान्देश रतन – कामरेड शरद पाटील
- खान्देश रतन – ख्वाजा नाईक
- खान्देश रतन – राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे
- खान्देश रतन – धनाजी नाना चौधरी (फैजपूर काँग्रेस)
- खान्देश रतन – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
- खान्देश रतन – कर्मवीर भाऊसाहेब हिरे
- खान्देश रतन – अभिनय सम्राज्ञी महाराष्ट्रनी अस्मिता : पद्मश्री स्मिता पाटील
- खान्देश रतन – दाजीसाहेब रोहिदास पाटील
- खान्देश रतन – निसर्ग कवी, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे
- खान्देश रतन – कवी विनायक
- खान्देश रतन – भारतनी पह्यली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
- खान्देश रतन – आहिरानी भास्या रतनेस्ना मुकूटमनी कै.डॉ.दा.गो.बोरसे (आण्णा)
- खान्देश रतन – बाळ सीताराम मर्ढेकर
- खान्देश रतन – ग्यानपीठ इजेता भालचंद्र वनाजी नेमाडे
- खान्देश रतन – प्रा. पुरुषोत्तम पाटील
- खान्देश रतन – प्रा. राजा महाजन
- खान्देश रतन – शिल्पकार राम सुतार
- खान्देश रतन – डॉ. रमेश सूर्यवंशी
- खान्देश रतन – डॉ. रविंद्रनाथ टोणगावकर
- खान्देश रतन – उलगुलानवाली प्रतिभाताई शिंदे
- खान्देश रतन – पत्रकार महर्षी सोमनाथ दादा पाटील
- खान्देश रतन – अमयनेरना प्रतापशेठजी