साहित्य आणि समाजशास्त्रीय संशोधन
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
शास्त्र (विज्ञान), समाजशास्त्र व साहित्यादी कला, अशा विविध मानवीजीवनाशी निगडित विद्याशाखा अस्तित्वात असून त्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. कुठल्याही शाखेसाठी अमुक एक सर्वगामी व मूलगामी अशी संशोधन पद्धत निश्चित केलेली आढळून येत नाही, म्हणून काही विषयात झालेले संशोधनपर लेखन पाहिले, तर संशोधन हे एक शास्त्र असूनही अभ्यासकांमध्ये विरोधाभास आढळतो. तेव्हा काही संशोधनपर ग्रंथांचा समग्रतेने विचार करून संशोधक विद्यार्थ्यांसाठी व अभ्यासकांसाठी एक सुलभ सुटसुटीत असे ‘साहित्य व समाजशास्त्रीय संशोधन पद्धती’चे पुस्तक उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण संशोधन पद्धतीचा अभ्यास करताना एकाच पुस्तकात क्रमबद्ध, सूत्रबद्ध व परिपूर्ण अशी माहिती आढळून आलेली नाही. जसे- संशोधन पद्धती किती व कोणत्या? संशोधनाची संकल्पना व स्वरूप कसे? संशोधनाचे प्रकार नेमके किती व कोणते? व त्याचा क्रम कसा असावा?, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. साहित्य आणि समाजशास्त्रातील वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल, अशी मांडणी या ग्रंथात केलेली आहे.
– प्रा. उन्नती संजय चौधरी
1. संशोधन : संकल्पना व स्वरूप :
1.1 संशोधन : स्वरूप व प्रयोजन
1.2 संशोधनाची पूर्वतयारी
1.3 संशोधकाचे गुण
1.4 संशोधन प्रक्रियेतील विविध टप्पे
1.5 संशोधनाची साधने : संदर्भ ग्रंथ, वृत्तपत्रे, कोशवाङ्मय,
सूचीवाङ्मय, हस्तलिखिते, शिलालेख इत्यादी.
2. संशोधनाच्या पद्धती :
2.1 विगमन
2.2 निगमन
2.3 क्षेत्रीय सर्वेक्षणात्मक पद्धती
2.4 तुलनात्मक संशोधन पद्धती
2.5 ऐतिहासिक संशोधन पद्धती
2.6 विश्लेषणात्मक संशोधन पद्धती
3. संशोधनाचे प्रकार व अभ्यासक्षेत्रे :
3.1 साहित्यकृतीनिष्ठ संशोधन
3.2 साहित्यप्रकारनिष्ठ संशोधन
3.3 लेखकाचा अभ्यास
3.4 कालखंडाचा अभ्यास
3.5 भाषिक संशोधन
3.6 लोकसाहित्यविषयक संशोधन
3.7 तौलनिक साहित्याभ्यास
3.8 संशोधनाचे अभ्यासक्षेत्रे
4. संशोधन प्रक्रिया :
4.1 संशोधन विषयाचे महत्त्व
4.2 संशोधनाचा आराखडा (विषय निवडीमागील भूमिका,
पूर्व संशोधनाचा परामर्ष, गृहीतके, उद्दिष्टे, व्याप्ती व मर्यादा,
संशोधन पद्धती, प्रकरणांची मांडणी)
4.3 संशोधन प्रबंधांचे लेखन : स्वरूप, मांडणी, लेखन तंत्र, भाषा,
संदर्भांचे उपयोजन व संदर्भाची नोंद करण्याची पद्धती
5. समाजशास्त्रीय संशोधन :
5.1 संकल्पना व स्वरूप
5.2 समाजशास्त्रीय संशोधन : प्रयोजन व महत्त्व
5.3 आंतर्विद्याशाखा व साहित्य संशोधन : एक अनुबंध