भारतीय संविधान
Indian Constitution
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
‘भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेची तोंडओळख करून देण्यात आली आहे. राज्यघटना बारकाईने समजून घेण्यासाठी राज्यघटनेच्या निर्मितीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटना निर्मितीसाठी घटना समितीची मागणी, घटना समितीची निर्मिती, घटना समितीचे कामकाज, स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार राज्यघटनेत घडून आलेले बदल, घटना समितीच्या समित्या, घटनेची स्वीकृती, घटना समितीचा कार्यकाळ, राज्यघटनेचा सरनामा, राज्यघटनेचे उगमस्थान, सरनाम्याचे महत्त्व, भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये यांची साध्या व सोप्या शब्दांत मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे सहज सोप्या भाषेत सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. पुस्तकाच्या शेवटी भारतीय राज्यघटनेतील सर्व कलमांची यादी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकात 2024 पर्यंतची भारतीय राज्यघटनेची अद्यावत आणि अचूक माहिती देऊन हे पुस्तक परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागांच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो.
1. भारतीय राज्यघटनेची निर्मिती
(Making of the Indian Constitution)
अ) ऐतिहासिक पार्श्वभूमी
ब) संविधान सभा
क) प्रस्तावना
ड) भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये
2. मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये आणि राज्य धोरणाची
मार्गदर्शक तत्त्वे
(Fundamental Rights, Fundamental Duties and Directive Principles of State Policy)
अ) अर्थ आणि महत्त्व
ब) मूलभूत हक्क
क) मूलभूत कर्तव्ये
ड) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
भारतीय राज्यघटनेची कलमे (1 ते 395)