आधुनिक कार्यालय व्यवस्थापन
Modern Office Management
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेच्या एफ. वाय. बी. कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. एफ. वाय. बी. कॉम वर्गाच्या अभ्यासक्रमात आधुनिक कार्यालय व्यवस्थापन हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन. ई. पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.
1. आधुनिक कार्यालय सेवा
(Modern Office Services)
1.1 प्रस्तावना, कार्यालय संकल्पना
1.2 आधुनिक कार्यालयाची भूमिका
1.3 पारंपरिक कार्यालयाचा अर्थ आणि व्याख्या
1.4 पारंपरिक कार्यालय आणि आधुनिक कार्यालयांमधील फरक
1.5 आधुनिक कार्यालयातील कामाचा प्रवाह
1.6 आधुनिक कार्यालयातील यांत्रिकीकरणाचे महत्त्व
1.7 आधुनिक कार्यालयाचे स्थान आणि आधुनिक कार्यालयाच्या अंतर्गत रचना निवडीवर परिणाम करणारे घटक
1.8 डिजिटल कार्यालय/डिजिटल कामाची जागा
2. कार्यालय स्वयंचलीकरण
(Office Automation)
2.1 कार्यालय स्वयंचलीकरण अर्थ व व्याख्या
2.2 कार्यालय स्वयंचलीकरणाची वैशिष्ट्ये
2.3 कार्यालय उपयुक्तता
2.4 खुले कार्यालय आणि खासगी कार्यालय
2.5 कार्यालय स्वयंचलीकरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
3. कार्यालयीन प्रक्रिया/कार्यपद्धती आणि
कार्यालयीन कामाचे प्रमाणीकरण
(Office Procedure and Standardisation of Work)
3.1 कार्यालयीन प्रक्रिया/कार्यपद्धतीचा अर्थ, व्याख्या आणि संकल्पना
3.2 कार्यालयीन कार्यपद्धतीचे महत्त्व
3.3 कार्यालयीन कामाचे प्रमाणीकरण – अर्थ, उद्दिष्टे, प्रमाणीकरणाचे क्षेत्र
3.4 मानकांचे प्रकार, पद्धती, मानकांचे फायदे-तोटे
4. कार्यालय माहिती पुस्तिका आणि मानक प्रणाली
(Office Manuals and Standard Operating Procedures)
4.1 कार्यालय माहिती पुस्तिकेचा अर्थ
4.2 कार्यालयीन माहिती पुस्तिकेची आवश्यकता/गरज
4.3 कार्यालयीन माहिती पुस्तिकेचे प्रकार
4.4 कार्यालय माहिती पुस्तिकेचे फायदे व तोटे
4.5 मानक कार्यप्रणाली