विपणनाची मूलतत्त्वे
Fundamentals of Marketing
Authors:
ISBN:
₹70.00
- DESCRIPTION
- INDEX
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व विद्याशाखेच्या प्रथमवर्ष पदवी अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बहुशाखीय शिक्षण विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपली विद्याशाखा सोडून इतर विद्याशाखेतील एक विषय ओपन इलेक्टीव विषयाअंतर्गत 2 क्रेडिट साठी सक्तीने घ्यावा लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विपनणाची मूलतत्वे हा विषय कला शाखेच्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे, त्यादृष्टीने प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी.पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.
प्रकरण 1
बाजार व विपणनाची ओळख
(Introduction to Market and Marketing)
1.1 बाजाराचा अर्थ व व्याख्या
1.2 बाजाराचे प्रकार
1.3 विपणन संकल्पना
1.4 आधुनिक व पारंपारिक विपणन यातील फरक,
1.5 विपणनाचे महत्व
1.6 विपणनाचे कार्ये,
1.7 विक्री vs विपणन
प्रकरण 2
विक्रयकला
(Salesmanship)
2.1 प्रस्तावना-विक्रयकलेचा अर्थ व व्याख्या
2.2 विक्रयकलेची व्याप्ती व वैशिष्टे
2.3 विक्रयकलेची तत्वे
2.4 विक्रयकला-एक शास्त्र एक कला
2.5 विक्रेत्याचे गुण
2.6 विक्रयकला-एक पेशा