स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन
Authors:
ISBN:
₹185.00
- DESCRIPTION
- INDEX
21 वे शतक हे स्पर्धेचे युग म्हणून ओळखले जाते. जिथे स्पर्धा म्हटली तिथे अचूक अभ्यासक्रम समजून घेणे, संदर्भ ग्रंथ, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव अशा गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते.
आपल्या देशाचा विचार केला असता दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. त्याप्रमाणात नोकर भरतीची गरज वाढते; तसेच विविध विभागातील पदे सेवानिवृत्तीमुळे व नैसर्गिक वाढीमुुळे रिक्त होतात. त्यामुळे दिवसेंदिवस रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षांमार्फत विविध विभागात नोकर भरती केली जाते. याठिकाणी प्रचंड स्पर्धा असते. अशा या स्पर्धेमध्ये अचूक संदर्भ ग्रंथांची निवड करणे खूप महत्त्वाचे असते. कारण स्पर्धेत जिंकायचे असेल तर तुमच्याकडे योग्य संदर्भ ग्रंथ असणे महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये भाषा या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व असते. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर एम.पी.एस.सी.राज्य सेवा (मुख्य परीक्षा) व पोलीस उपनिरीक्षक/विक्रीकर निरीक्षक/मंत्रालय सहायक (मुख्य परीक्षा) तसेच तलाठी, ग्रामसेवक, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (ढएढ), जिल्हा निवड समिती अंतर्गत वरिष्ठ/कनिष्ठ लिपिक भरती, सरळ सेवा – समाज कल्याण निरीक्षक, पाटबंधारे निरीक्षक, वनविभाग, पोलीस भरती, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नेट (मराठी), सेट (मराठी) इत्यादी स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. मराठी भाषा व मराठी व्याकरण या विषयांचा अभ्यास वरील परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आपली मातृभाषा मराठी आहे. आपण दररोज मराठी ऐकतो, बोलतो म्हणजे आपल्याला मराठी व्याकरण येतेच असे नाही, तर त्यासाठी मराठी व्याकरणाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो.
1. स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे स्वरूप व महत्त्व
1.1 स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे स्वरूप
1.2 स्पर्धा परीक्षेत मराठी व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व
2. सारांशलेखन
2.1 सारांशलेखन : संकल्पना, स्वरूप
2.2 सारांशलेखनाचे महत्त्व व गरज
2.3 सारांशलेखनाचे तंत्र
2.4 सारांश लेखनासाठी आवश्यक गोष्टी
2.5 सारांशलेखनाचे टप्पे/पायऱ्या
2.6. सारांशलेखनाचे उपयोजन
3. भाषांतर
3.1 भाषांतराची संकल्पना व स्वरूप
3.2 भाषांतरातील काही संज्ञा
3.3 भाषांतराचे प्रकार
3.4 भाषांतर शास्त्र की कला?
3.5 भाषांतर उपयोजन
4. कल्पनाविस्तार
4.1 कल्पनाविस्तार संकल्पना व स्वरूप
4.2 कल्पनाविस्ताराच्या पायऱ्या
4.3 कल्पनाविस्तारासाठी उपयुक्त बाबी
5. निबंध लेखन
5.1. निबंधाची संकल्पना व स्वरूप
5.2 निबंधाचे प्रकार व उपयोजन
6. मराठी वर्णमाला
6.1 भाषा, लिपी, व्याकरण, वर्ण, अक्षर, वाक्य
6.2 मराठी वर्णमाला, स्वर, स्वरांचे प्रकार, स्वरादी, व्यंजने, अल्पप्राण, महाप्राण.
7. म्हणी व वाक्प्रचार
7.1 म्हणी
7.2 म्हणींचा समर्पक उपयोग
7.3 वाक्प्रचार
7.4 वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग
8. विकारी व अविकारी शब्द
8.1. विकारी शब्द (नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद)
8.2. अविकारी शब्द (क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय)
9. शब्दसिद्धी
9.1 तत्सम, तद्भव, साधित, उपसर्गघटीत, प्रत्ययघटीत शब्द, सामासिक शब्द
9.2 समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेकार्थी, शब्द समूहासाठी एक शब्द
10. संधी
10.1 संधी म्हणजे काय?
10.2 संधीचे प्रकार – स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी
11. समास
11.1 समास म्हणजे काय?
11.2 समासाचे प्रकार-अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास
12. विरामचिन्हे
13. प्रमाणलेखन