लोकसंख्या भूगोल
Population Geography
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
सुजान वाचक मित्रहो, कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाच्या प्रगतीतील एक प्रेरक शक्ती असते किंबहुना ही त्या देशाची एक महत्त्वाची साधनसंपत्ती मानली जाते. परंतु आधुनिक काळात झालेली लोकसंख्या वाढ ही एक चिंतनाचा विषय ठरत आहे. कारण 21 व्या शतकात जगातील लोकसंख्या वाढीने विस्फोटक रूप धारण केले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे हे लोकसंख्या भूगोलाचे महत्त्वाचे कार्य आहे. म्हणून लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करणे ही काळाची गरज बनली. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही ‘लोकसंख्या भूगोल’ हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकामध्ये लोकसंख्या भूगोल ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती आणि लोकसंख्या सामग्रीचे प्रकार आणि स्त्रोत, लोकसंख्या घनता, घनतेचे प्रकार आणि लोकसंख्या सिद्धांत, भारताचे व जागतिक लोकसंख्या वितरण, लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्येची संकल्पना आणि 2000 चे भारताचे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जनन, मर्त्यता आणि स्थलांतर, लोकसंख्या रचना आणि वैशिष्टे – यात लिंगरचना, वयरचना, भारतातील लिंगरचना, वैवाहिक स्थिती, साक्षरता आणि 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील धार्मिक स्थिती इत्यादी घटकांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना व वाचकांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, अतिशय योग्य पद्धतीने विषयाचमी मांडणी, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक केवळ विद्यापीठ व महाविद्यालयीन अभ्यासक्रमापुरता मर्यादित न राहता भूगोलप्रेमी अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल यादृष्टीने प्रयत्न करण्यात आलेले आहे.
1. लोकसंख्या भूगोलाची ओळख
(Introduction to Population Geography)
1.1 लोकसंख्या भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definitions, Nature and Scope of Population Geography)
1.2 लोकसंख्या सामग्रीचे प्रकार आणि स्रोत
(Types and Sources of Population Data)
1.2.1 लोकसंख्या सामग्रीचे प्रकार
1) प्राथमिक सामग्री (Primary Sources)
2) द्वितीयक सामग्री (Secondary Sources)
1.2.2 लोकसंख्या सामग्रीचे स्रोत
1) जनगणना (Census)
2) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (National Sample Survey)
3) जीवनविषयक महत्त्वपूर्ण नोंदी (Vital Registration)
2. लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या सिद्धांत
(Population Density and Theories of Population)
2.1 लोकसंख्या घनतेची व्याख्या आणि प्रकार
(Definitions and Types of Population Density)
2.2 लोकसंख्या सिद्धांत
(Population Theories)
2.2.1 माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत
(Malthusian Theory of Population Growth)
2.2.2 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत
(Demographic Transition Model)
3. लोकसंख्या वितरण
(Distribution of Population)
3.1 भारतातील लोकसंख्या वितरण (2011 च्या जनगणनेनुसार)
(Distribution of Population in India According to
Census 2011)
3.2 भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting the Distribution of Population in India)
3.2.1 प्राकृतिक घटक (Physical Factors)
i) भूरचना (Topography), ii) हवामान (Climate),
iii) पाणी (Water), iv) मृदा (Soil),
v) वनस्पती (Forest)
3.2.2 सांस्कृतिक घटक (Cultural Factors)
i) धर्म (Religion), ii) शेती (Agriculture),
iii) वाहतूक (Transportation), iv) शिक्षण (Education),
v) शासकीय धोरण (Government Policy)
3.2.3 आर्थिक घटक (Economic Factors)
3.2.4 लोकसंख्याशास्त्रीय घटक (Demographic Factors)
3.3 जागतिक लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting on Distribution of Population in world)
4. लोकसंख्येची संकल्पना आणि लोकसंख्या धोरण
(Concept of Population & Population Policy)
4.1 लोकसंख्या संकल्पना (Concept of Population)
4.1.1 न्यूनतम लोकसंख्या (Under Population)
4.1.2 पर्याप्त लोकसंख्या (Optimum Population)
4.1.3 अतिरिक्त लोकसंख्या (Over Population)
4.2 न्यूनतम आणि अतिरिक्त लोकसंख्येचे परिणाम आणि उपाय
(Effects and Remedies of Under Population and Over
Population)
4.3 भारताचे लोकसंख्या धोरण-2000
(National Population Policy of India – 2000)
5. जनन, मर्त्यता आणि स्थलांतर
(Fertility, Mortality and Migration)
5.1 जनन (Fertility):
5.1.1 व्याख्या (Definitions)
5.1.2 जननवर परिणाम करणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक
(Social and Cultural Factors Affecting Fertility)
5.1.3 ढोबळ जन्मदर (Crude Birth Rate)
5.2 मर्त्यता (Mortality)
5.2.1 व्याख्या (Definitions)
5.2.2 मर्त्यतेचे मापन (Measures of Mortility)
i) ढोबळ मृत्युदर (Crude Death Rate)
ii) अर्भक मृत्यू दर (Infant Mortality)
iii) मर्त्यतेची पातळी आणि कल
(Levels and Trend of Mortality)
5.3 स्थलांतर (Migration):
5.3.1 व्याख्या (Definition)
5.3.2 स्थलांतराचे प्रकार (Type of Migration)
5.3.3 स्थलांतराची कारणे आणि परिणाम
(Causes and Effect of Migration)
5.3.4 बुद्धीवहन (Brain Drains)
6. लोकसंख्येची रचना आणि वैशिष्ट्ये
(Structure and Characteristics of Population)
6.1 लिंग रचना (Sex Structure)
6.2 वयरचना (Age Structure)
6.2.1 वय रचनेचे महत्त्व (Importance of Age Structure)
6.2.2 वय रचनेचे घटक (Determinants of Age Structure).
6.2.3 वय मनोरा (Age Pyramid)
6.2.4 वयोगट (Age Group)
6.3 भारतातील लिंग रचना (Sex Ratio in India)
6.3.1 घटत्या लिंग रचनेची कारणे आणि त्याचे परिणाम
(Causes of Decreasing Sex Ratio and Its Impact)
6.4 वैवाहिक स्थिती
(Marital Status)
6.5 साक्षरता आणि शैक्षणिक उपयोगिता
(Literacy and Educational Attainment)
6.6 भारतातील धर्म (2011 च्या जनगणनेनुसार)
(Religious in India, According to Census 2011)