विवाह पलीकडील सत्य
‘विश्वास’ हा संस्कारांवरती आधारित असतो आणि ‘संस्कार’ चांगल्या विचारांनी संवर्धित होतो. चांगल्या विचारांसाठी शुद्ध मनाची आवश्यकता असते. विवाह आणि त्याअनुषंगाने नातेसंबंध ही अशाच विश्वासाची गुंफण असली पाहिजे. परंतु कलुषित जळमटे घेऊन अशुद्ध मनाने माणसे जीवनाचा प्रवास करू लागली तर संस्कारांसोबत संस्कृती बिघडते. त्यामुळे संस्कार ध्येयाकडे जाण्यासाठी भारतीताई कुमावत यांनी विवाहाच्या विश्वासपूर्ण नात्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेली मल्लिनाथी ही वाचक समूहाला विचारप्रवण करणारी ठरेल !
– प्रा. डॉ. म. सु. पगारे
संचालक, भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र,
संचालक, विचारधारा प्रशाळा,
वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख (मराठी, हिंदी, इंग्रजी),
व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ.उ.म.वि., जळगाव.