Your cart is empty now.
एम.कॉम., बी.कॉम. व अर्थशास्त्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व इतर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांंसाठी उपयुक्त असेल. या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, औद्योगिकरणाचे आर्थिक विकासात महत्व व परिणाम, औद्योगिकरणाचे घटक, औद्योगिक संस्था व बाजारपेठ रचना, औद्योगिक स्थान निश्चियन, गुंतवणूक निर्णय, किंमतविषयक निर्णय, संशोधन विकास व नवोन्मेष, भारतातील औद्योगिक विकास, नवीन औद्योगिक धोरण, औद्योगिक नियंत्रणविषयक कायदे, औद्योगिक श्रमिक,
भारतातील सामाजिक सुरक्षा, निर्गम निती इत्यादी विषय हाताळले आहेत. यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्वानुसार एम.कॉम.च्या अभ्यासक्रमावर आधारीत हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, सहज समजण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध ग्रंथांचा संदर्भ घेवून अद्ययावत माहितीचा समावेश त्यात केलेला आहे.