Your cart is empty now.
‘प्रगत सुक्ष्म अर्थशास्त्र’ हा विषय आमचे गुरूवर्य प्रोफेसर डॉ.एन.एल. चव्हाण (निवृत्त) फैजपूर यांनी ज्या पध्दतीने आमची विषयाबद्दलच्या ज्ञानाची पायाभरणी केली. व त्या आधारावर जवळपास हा विषय अध्यापनाचा गेली 25 वर्षाचा अनुभव आम्हाला अध्यन-अध्यापनातून समजला त्याचच फलित म्हणजे हे क्रमिक पुस्तक आहे. गुरूवर्यानी दाखविलेला ज्ञानमार्ग आपल्या जीवनप्रवासाची खरी शिदोरी असते.
सूक्ष्म अर्थशास्त्र हा अभ्यास विषय सिध्दांत आणि आकृतयांनी तांत्रिक पध्दतीतून अभ्यासायचा असतो. हा विषय संपूर्ण अर्थशास्त्रात (एपींळीश एलेपेाळली) सर्वोच्च स्थानावर आहे. या विषयाच्या आकलनावरच आपल्याला अर्थशास्त्राच्या विविध विषयाचे आकलन होणे सोपे जाते. हा विषय सर्व सामान्य विद्यार्थ्यांना सहज समजावा या दृष्टीकोणातून सोप्या पध्दतीने मांडणी केली आहे. द्वितिय वर्ष कला साद-5.0 विशेष विषय ऊडउ-7-एले-211 सत्र-खखख व ऊडउ-10 एले 221-सत्र-खत-श्रेयांक (उीशवळीं) प्रत्येक सत्रासाठी 2 असणार असून त्याची अंतर्गत परिक्षा - 20 गुणांची असेल तर विद्यापीठ स्तरीय परिक्षा-30 गुणांची असणार आहे. प्रथम सत्रात 2 प्रकरणे (सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय, व उपभोक्त्यांची वर्तणूक संख्यावाचक दृष्टीकोण) असतील तर दुसऱ्या सत्रात 2 प्रकरणे (उपभोक्त्यांची वर्तणूक-क्रमवाचक दृष्टीकोण व उत्पादनाचे घटक) अशी मनोभाव अभ्यासक्रमाची रचना असणार आहे.