Welcome to Prashant Publications

Rs. 75.00
Availability: 10 left in stock

हे पुस्तक लिहिताना मनात प्रामुख्याने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू होता. ‘आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला' हा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी आवडीचा असला, तरी काहींना तो गुंतागुंतीचा वाटू शकतो. ही गुंतागुंत दूर व्हावी,...

  • Name : आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA
  • Manufacturing : 2026 / 04 / 13
  • Barcode : 9789377761752

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला
- +

हे पुस्तक लिहिताना मनात प्रामुख्याने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू होता. ‘आधुनिक महाराष्ट्रातील कला आणि वास्तुकला' हा विषय अनेक विद्यार्थ्यांसाठी आवडीचा असला, तरी काहींना तो गुंतागुंतीचा वाटू शकतो. ही गुंतागुंत दूर व्हावी, विषय सोपा, रंजक आणि परीक्षेच्या दृष्टीकोनातून उपयुक्त व्हावा, या हेतूने या पुस्तकाची रचना केली आहे.
वसाहतवादी वास्तुकला, चित्रकला आणि पारंपरिक हस्तकला अशा तीन प्रमुख प्रकरणांमध्ये विषयाचे विभाजन करताना प्रत्येक उपप्रकरणात व्याख्या, वैशिष्ट्ये, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि उदाहरणे यांचा समावेश केला आहे. प्रकरण 1 मध्ये गॉथिक पुनरुज्जीवन व इंडो-सारासेनिक वास्तुकलेतील मुख्य इमारतींची सविस्तर माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई उच्च न्यायालय, राजवाडे यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास विद्यार्थ्यांना स्थानिक संदर्भासह समजावा, याकडे लक्ष दिले आहे.
प्रकरण 2 मध्ये वारली चित्रकलेपासून सुरुवात करून राजा रवि वर्मा यांच्या अकादमिक शैलीपर्यंत, तसेच बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपच्या आधुनिक प्रयोगशीलतेचा आढावा घेतला आहे. जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे ऐतिहासिक योगदान आणि आर्ट गॅलरींनी कलाक्षेत्रात केलेल्या कार्याची माहितीही या प्रकरणात समाविष्ट केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या विकासाचा संपूर्ण आलेख समजेल. प्रकरण 3 मध्ये महाराष्ट्राच्या पारंपरिक हस्तकलेचा परामर्श घेतला आहे. पैठणी साडीचे वैशिष्ट्यपूर्ण विणकाम, सावंतवाडीतील लाकडी कोरीवकामाची कारागिरी आणि हुप्री येथील चांदीच्या कामाची बारीक नक्षी यांचा तपशीलवार अभ्यास येथे दिला आहे. प्रत्येक हस्तकलेचा भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सारांशचा समावेश केला आहे.     

प्रकरण 1.......................................................................7
वसाहतवादी वास्तुकला
अ. व्याख्या आणि वैशिष्ट्ये
ब. महाराष्ट्रातील गॉथिक पुनरुज्जीवन वास्तुकला
क. महाराष्ट्रातील इंडो-सारासेनिक वास्तुकला

प्रकरण 2.....................................................................18
चित्रकला
अ. वारली चित्रकला
ब. राजा रवि वर्मा आणि बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स गृप
क. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट आणि आर्ट गॅलरींची भूमिका

प्रकरण 1.....................................................................38
पारंपरिक हस्तकला
अ. पैठण - पैठणी
ब. सावंतवाडी - लाकडी हस्तकला
क. हुप्री- चांदीचे काम

संदर्भ ग्रंथसूची...............................................................54