Your cart is empty now.
‘गझल’ हा तंत्रशरण काव्यप्रकार असला तरी त्यात काही शेर उत्स्फूर्तपणे आलेले असतात. गझलेतला प्रत्येक शेर (द्विपदी) म्हणजे स्वतंत्र कविता असते. गझल नेहमीच वाचणार्याला अंतर्मूख करते नि विशुद्ध आनंदाचा अनुभव देते.
या संपादनातील राजा महाजनांची गझल ही स्वतःला आणि वाचकांना आत्मशोधाच्या वाटेवर चालायला भाग पाडते. वा.न.सरदेसाई यांची गझल जीवनविषयीचे अतिशय अर्थपूर्ण भाष्य करते. जीवनाच्या लयीशी वाचकाची लय जोडून देते. वाचकाला विचाशील करते. तर सामजिक, राजकीय, धार्मिक आणि एकूणच भोवतालाच्या व्यंग, बिसंगतीवर वा. ना. आंधळे यांची गझल अचूकपणे बोट ठेवले आणि स्वस्थ समाजासाठी विचार करायला लावते.
या तीन ज्येष्ठांच्यानंतर प्रत आणि प्रमाण या दोन्ही अंगाने खानदेशातील गझल आता मराठी सारस्वतांसाठी, रसिकांसाठी दखलपात्र झाली आहे.