Your cart is empty now.
डॉ. जयश्री गावित ह्या धुळ्याच्या विद्यावर्धिनी महाविद्यालयात हिंदी विषयाच्या प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत असून मावची बोलीचे लोकसाहित्यिक अध्ययन करणार्या व विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त करणार्या खानदेशातील पहिल्या अभ्यासिका आहेत. त्यांचे संशोधन ‘लोकसाहित्य विविध आयाम एवं नवी दृष्टि’ नावाने सर्व भारतभर प्रसिद्ध आहे. ‘मावची लोककथा’, ‘लोकगीत : आदिवासियों की सांस्कृतिक धरोहर’, ‘इसापनीति’, ‘परिवर्तनवादी परंपरा और हिंदी साहित्य’ इत्यादी पुस्तक प्रकाशित असून कॉ. नजूबाई गावित ह्यांच्या ‘तृष्णा’ ह्या मराठीत गाजलेल्या कादंबरीचा त्यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहे.