Welcome to Prashant Publications

Rs. 150.00
Availability: 10 left in stock

पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानव विकास (भाग-2)
- +

पालकत्व म्हणजे खरतर घरामध्ये नित्यनेमाने घडणारे विविध छोटे मोठे प्रसंग, मतभेद, संघर्ष आणि अचानक उद्भवणार्या घटनावरील प्रतिसादांची एक न संपणारी मालिकाच असते. चांगल्या पालकत्वासाठी आवश्यकता आहे ती कौशल्याची. आजचे पालकत्व जास्त जबाबदारीचे आणि जोखीमेचे झाले आहे. आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले असतात असा समज समाजामध्ये आढळतो. बालकाचा रंग, रुप, आकार, बौध्दिक क्षमता आपल्या आई वडिलाशी मिळते जुळते असते. वास्तविक शरीररचना व बाह्यवेषभूषेवरून चांगले अगर वाईट व्यक्तित्व ठरविणे दोषपूर्ण ठरेल. मानवी विकासाच्या विविध पैलूचा अभ्यास करतांना व्यक्तित्व इतरांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा व अभिवृत्ती यांना अनुसरून निश्चित होईल. व्यक्तिपरत्वे व्यक्तीत्व बदलत जाईल. नेतृत्व हे व्यक्तीसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष आहे. समाज परिवर्तनासाठी शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असल्यानेच समाजात शिक्षकांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सदरील पुस्तकात अनुवंशिकता, वातावरण, विकासात यांची भूमिका, वातावरणाचे प्रकार, संयुक्त, विभक्त कुटुंबाची विकासात भूमिका, व्यक्तीमत्व संरक्षण यंत्रणा, स्वत्वकल्पना, प्रकार, नेतृत्व, प्रकार, गुण, बालकाच्या वर्तनसमस्या लैंगिक शिक्षण, महत्व, अपंग बालकाच्या शैक्षणिक अडचणी, किशोरावस्थेतील शारिरिक भावनिक बदल, सवयी, पालकत्व, प्रकार पालकबालक संबंध, महत्व, बालसंगोपनाच्या पद्धती, पालकांना आव्हान इ. विविध मुद्द्यांचा यथोचित समावेश केला आहे.