Your cart is empty now.
प्रशासन म्हणजे शासनाचे कृतीशील स्वरुप होय. या कृतीशीलतेमुळे प्रशासन गतिशील असावे असे सहज स्पष्ट होते, तरी प्रशासकिय संस्थाची सवय स्थिर आणि अविरत राहण्याची असते. मौर्य साम्राज्याच्या काळापर्यत शासन व प्रशासन इतके विकसित होते की, विस्तृत संख्येत शासकिय व प्रशासकिय कार्य सक्षमरित्या करण्याची पात्रता मिळाली होती. मौर्य काळानंतर मात्र शासनाची व प्रशासनाची यंत्रणा साचेबंद स्वरुपाची झाली. मोगल काळात प्रशासन सैनिकी व पोलीस स्वरुपाचे होते. प्रजेला राजकिय अधिकार नव्हते. ब्रिटिश काळात उच्च प्रशासकिय सेवा जन्मजात गुणांवर आधारित होऊन अनुवंशिक आणि प्रादेशिक गतीमानतेचा अभाव असलेली होती. तरीही प्रशिक्षित आणि निष्ठावान अशी होती. स्थानिक स्तरावरील प्रशासन स्वायत्त, विकेंद्रीत आणि स्वशासित स्वरुपाचे होते. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान लागू झाले. भारतीय वातावरणाला साजेसे एक व्यावहारीक संविधान करणे हेच घटनाकारांचे उद्दिष्ट होते. आधुनिक काळात राज्याला कल्याणकारी राज्य-प्रशासन कार्याची भूमिका पार पाडावी लागत आहे. प्रशासनाला जनतेच्या कल्याणाचा विचार करुन कार्य करावे लागते.
सदरील ग्रंथात प्रशासनाशी संबंधित सर्व घटकांचा मुद्देनिहाय समावेश करून त्याचे सविस्तर विवेचन केलेले आहे. ग्रंथाची भाषा साधी, सरळ व सोपी असून सर्व स्पर्धापरीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ग्रंथ ठरावा यासाठीच लेखनप्रपंच!