Your cart is empty now.
कृषी व्यवसाय हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आपल्या भारत देशाचा विकास संपूर्णत : शेतीवर अवलंबून आहे. शेती ही केवळ उदरनिर्वाहाचेे साधन राहिलेले नसून व्यापारी तत्त्वावर त्याचा उपयोग होवू लागला आहे. आणि म्हणून शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्यात येवू लागले. व्यवसायाचा भौगोलिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे ‘कृषी भूगोल’ होय.
कृषी प्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या भारत देशात भूगोलाच्या दृष्टीकोनातून कृषीच्या अभ्यासास विशेष महत्त्व आहे. या पुस्तकात कृषी भूगोलातील अनेक संज्ञा, आशय व संकल्पना विद्यार्थ्यांना व भूगोल अभ्यासकांना सहज समजतील अशा अत्यंत सोप्या व सरल शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.