Your cart is empty now.
जगामध्ये मानवी वस्तीस्थाने जलाभोवतीच आहेत. सागर आणि महासागर नैसर्गिक संपत्तीचे मोठे, अक्षय भांडार आहे. संपूर्ण सागर जलाचे चक्र, पृथ्वीची उत्पत्ती, खंडपरिवहन इत्यादी सर्व बाबी विचारात घेतल्या तर पृथ्वीवरील महासागराचे अस्तित्व न संपणारे आहे. सागर विज्ञानातूनच सागरासंबंधी यथायोग्य माहिती प्राप्त होते. सागर विज्ञानामुळेच पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये सागर विज्ञानाच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. 17 व्या शतकामध्ये सागर विज्ञानाची वैज्ञानिक स्तरावर अभ्यासाला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सागरा संदर्भातील सर्वच बाबीवर लक्ष देवून संशोधन झाले. सागराचे आर्थिक महत्व स्पष्ट झाले. जलभागातील तापमान, प्रदूषण, वादळ-वारे, पाऊस इत्यादी सर्वांचा सजीवांच्या जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे.
प्रस्तुत पुस्तकात सागरीय भूमी स्वरूपे, सागरजल गुणधर्म, सागरजलाच्या हालचाली, सामुद्रिक निक्षेप आणि प्रवाळ बेटांचा अभ्यासाचा यथायोग्य समावेश केलेला आहे.
Jalavaran