Your cart is empty now.
भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक घटकांच्या अभ्यासात एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदान करते. पृथ्वीवरील विस्तृतपणे पसरलेल्या भौगोलिक घटकांचे सर्वेक्षण, वर्गीकरण, सांख्यिकी मांडणी व तिचे विश्लेषण यांचे एक सर्व समावेशक सादरीकरण भौगोलिक माहिती प्रणाली मुळेच सहज सरळ व सोपे बनते. भौगोलिक माहिती प्रणाली या पुस्तकाचे लेखन करतांना आमचा प्रयत्न हाच राहिला आहे की, भौगोलिक माहिती प्रणाली सारख्या गुंतागुंतीच्या विषयाला सोपा, मनोरंजक, व्यवस्थित व क्रमबद्ध स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर पुस्तकात भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, भौगोलिक माहिती प्रणाली सांख्यिकी रचना, भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणाली आकडेवारी विश्लेषण व भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन यात विविध उपघटकांना उदाहरण व आकृतीसह एक नवीन रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
Bhaugolik Mahiti Pranali