Welcome to Prashant Publications

Rs. 450.00
Availability: 10 left in stock

भूगोल हे सर्वसमावेशक शास्त्र आहे. भूगोल या विषयात केवळ प्राकृतिक वा नैसर्गिक घटक व घटनांचाच अभ्यास समाविष्ट होत नसून त्यात मानवी क्रियाशीलतेचाही अभ्यास समाविष्ट होतो. किंबहुना मानवी भूगोल हे संपूर्ण...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

मानवी व आर्थिक भूगोल
- +

भूगोल हे सर्वसमावेशक शास्त्र आहे. भूगोल या विषयात केवळ प्राकृतिक वा नैसर्गिक घटक व घटनांचाच अभ्यास समाविष्ट होत नसून त्यात मानवी क्रियाशीलतेचाही अभ्यास समाविष्ट होतो. किंबहुना मानवी भूगोल हे संपूर्ण भूगोल विषयाचे एक आवश्यक अंग आहे. मानवाने आपल्या बुध्दी व कौशल्याच्या जोरावर निसर्गातील साधनसंपदेचा उपयोग आपले जीवन सुखकर होण्यासाठी केलेला आहे. कोळसा, खनिज तेल, लोह, धातु यांचा शोध घेऊन त्यांचा उपभोग घेऊन आपले राहणीमान उंचावले व जीवन अधिकाधीक संपन्न करुन घेतले. मानव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी विविध साधनांची निर्मिती करीत असतो. अशा संपदेचा त्यांच्या उत्पादन, वितरण यासंबंधीचा अभ्यास व मानव-संसाधन सहसंबंधाचा अभ्यास हे आर्थिक भूगोलाचे अभ्यासक्षेत्र आहे. प्राथमिक, व्दितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसायांमध्ये पर्यावरणीय घटकांमुळे बदल होतांना दिसून येतात. म्हणूनच आर्थिक भूगोलात मानवी व्यवसाय व भौगोलिक घटकांचा अभ्यास व त्यातील परस्पर संबंध अभ्यासला जातो.

प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा यथायोग्य प्रयत्न या पुस्तकात केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्या व नकाशांचा वापर केलेला आहे. प्रत्येक संज्ञा व संकल्पना सर्वांना सहज ज्ञात होतील अशा सुलभ भाषेत मांडण्यात आल्या आहेत.