Your cart is empty now.
‘राजकीय भूगोल’ हा विषय थोडासा क्लीष्ट असल्याने पुस्तकात बर्याच ठिकाणी संदर्भ व उदाहरणे देऊन संकल्पना अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या पुस्तकातून राजकिय भूगोलाचा परिचय, राज्य व राष्ट्र उत्क्रांती व विकास, भूराजनिती सिद्धांत आणि दोन राष्ट्रादरम्यान असलेला सिमा यावर सविस्तर लिखाण या पुस्तकातून आम्ही केला असल्याने ‘राजकिय भूगोलाची व्याप्ती’ आपल्या लक्षात येईलच.
राजकिय भूगोल म्हणजे राजनैतिक दृष्टिकोनातून संगठित क्षेत्र किंवा राज्यांच्या भौगोलिक रचनेच्या संदर्भात केलेला अभ्यास होय. कोणत्याही राज्याशी संबंधित भौगोलिक क्षेत्र त्या राज्यांची भौगोलिक वास्तविकता असते. राज्य हे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इ. संदर्भात गुणसंपन्न विभागासोबतच एक जिवंत विभागसुद्धा असतो. त्यावरूनच राजकिय भूगोलाची सार्थकता यावरूनच निश्चित होते.
Rajkiya Bhugol