Welcome to Prashant Publications

Rs. 295.00
Availability: 10 left in stock

इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भारताचा इतिहास (इ.स. 1206 ते 1756)
- +

इ.स.1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक यांनी भारतात सर्वप्रथम मुस्लिम सत्तेची स्थापना केली. त्यांनी स्थापना केलेले राज्य सुलतानशाही या नावाने ओळखले जाते. जहिरूद्दीन बाबर यांनी दिल्लीच्या सुलतानशाहीचे राज्य इ.स.1526 मध्ये जिंकून घेतले व त्याठिकाणी मुघल वंशाची स्थापना केली. दिल्लीचे सुलतान आणि मुघल सम्राटांनी संपूर्ण भारतावर राज्य केले. त्यांच्या काळात जी प्रादेशिक राज्ये होती ती सुलतानशाही व मुघलांची मांडलीक राज्ये होती. मुघल साम्राज्य इ.स.1857 पर्यंत अस्तित्वात असले तरी ते इ.स.1707 पर्यंतच प्रबळ व शक्तीशाली होते. यानंतर मात्र या साम्राज्याचा र्हास झाला. मध्ययुगात जी अनेक राज्ये स्वतंत्रपणे राज्य करीत होती. त्यापैकीच एक दक्षिण भारतातील मराठा राज्य होते. हे राज्यही शक्तिशाली राज्य होते. मुघल बादशाहाने सुद्धा स्वत:च्या संरक्षणाची जबाबदारी मराठा राज्यावर टाकली होती. तसा त्यांच्यात इ.स.1752 मध्ये एक करारही झाला होता. मुघल बादशाहाच्या संरक्षणासाठीच मराठ्यांनी अहमदशहा अब्दाली विरूद्ध युद्ध केले व ते त्यांच्याकडून पराभुत झाले. या पराभवामुळे व युद्धातील जीवित हानीमुळे मराठा राज्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर येथून पुढे मराठा राज्यही र्हासाकडे वाटचाल करू लागले. इ.स.1818 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने मराठा राज्य जिंकून घेतले. मध्ययुगात दिल्लीचे मुघल व महाराष्ट्रातील मराठा राज्य महत्वाचे होते. या दोन्ही राज्याच्या कालखंडातील भारतातील राजकीय, सामाजिक, धार्मिक व आर्थिक इतिहासाची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.