Welcome to Prashant Publications

Rs. 295.00 10% OFF
Availability: 10 left in stock

काप्रा सांगतो की आजचे Relativity (सापेक्षतावाद) आणि Quantum Theory (क्वांटम सिद्धांत) हे विज्ञान आपल्याला सांगतात की, विश्वातील प्रत्येक गोष्ट परस्पराशी जोडलेली आहे (Interconnectedness); काहीही स्वतंत्र नाही; सर्व काही एका अदृश्य...

  • Name : भौतिकशास्त्र आणि अध्यात्म दर्शनातून उलगडत जाणारे ‌‘विश्वाचे अंतिम सत्य‌’
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789377766054
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भौतिकशास्त्र आणि अध्यात्म दर्शनातून उलगडत जाणारे ‌‘विश्वाचे अंतिम सत्य‌’
- +

काप्रा सांगतो की आजचे Relativity (सापेक्षतावाद) आणि Quantum Theory (क्वांटम सिद्धांत) हे विज्ञान आपल्याला सांगतात की, विश्वातील प्रत्येक गोष्ट परस्पराशी जोडलेली आहे (Interconnectedness); काहीही स्वतंत्र नाही; सर्व काही एका अदृश्य ऊर्जा-लहरींनी गुंफलेले आहे. हे ऐकताना जणू पूर्वेकडील ङ्गताओङ्घ किंवा ङ्गब्रह्मङ्घ या संकल्पना पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटते.
ताओवाद म्हणतो - विश्व दोन विरुद्ध पण एकमेकांना पूरक शक्तींनी चालते - Yin आणि Yang - एक काळोख, दुसरा प्रकाश; एक शांत, दुसरा गतीशील. या दोघांचा संतुलित संवादच निसर्गाचे सौंदर्य घडवतो. अगदी तसंच क्वांटम जगातही कण आणि तरंग हे दोन वेगळे नव्हेत, तर एकाच सत्याची दोन रूपे सर्वकडे आहेत. हीच विज्ञानातील Complementarity (परस्परपूरकता) आहे.
काप्रा सांगतो की अणूंच्या जगात सर्वकडे सतत हालचाल सुरू आहे. तो या दृश्याला “Cosmic Dance”असे म्हणतो. हे नृत्य म्हणजे निसर्गाचे हृदय धडधडणे आहे. वेदांताने जसे सांगितले की सर्व काही ब्रह्मच आहे, तसे काप्रा म्हणतो की सर्व काही ऊर्जेच्या नृत्यात सामावलेले आहे.
बौद्ध तत्त्वज्ञानातील “Shunyata” (शून्यता) ही संकल्पना - म्हणजे काहीही स्वतःपुरते अस्तित्वात नाही, सर्व काही संबंधांतून प्रकट होते. ही क्वांटम सिद्धांतातील अनिश्चितता (Uncertainty) या विचाराशी किती सुसंगत आहे हे तो दाखवतो.
अशा रीतीने “The Tao of Physics” हे पुस्तक आपल्याला सांगते की विज्ञान आणि अध्यात्म हे दोन वेगळे मार्ग नाहीत. ते दोन्ही एका सत्याकडे नेतात - त्या सत्याचे नाव आहे एकत्व, संतुलन आणि नृत्य.
हे पुस्तक आपल्याला शिकवते की विश्व मोजमापांमध्ये नव्हे, तर लयीत आणि सौंदर्यात जगते. विज्ञानाने शोधलेले तत्त्व आणि अध्यात्माने अनुभवलेले तत्त्व -दोन्ही एकाच सुरात म्हणतात की, ङ्गसर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे आणि त्या जोडणीचं नावच आहे Tao.”
या प्रकरणात काप्रा यांनी एकात्मतेचा अनुभव घेण्याचे महत्त्व सांगितले आहे"The experience of unity is the ultimate goal of both science and spirituality."
"The Tao of Physics" हे पुस्तक विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील एकात्मतेचा संदेश देते. क्वांटम भौतिकशास्त्रातील गूढता आणि तत्त्वज्ञानातील ध्यानाचे अनुभव यांच्यातील समानता दर्शवून, काप्रा यांनी या दोन्ही क्षेत्रांमधील परस्परसंबंध स्पष्ट केले आहेत. वाचकाला विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील एकात्मतेचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट या पुस्तकाचे आहे.
Tao of Physics पुस्तकाचे हे संक्षिप्त स्वरूपातील मराठी भाषांतर वाचकाला प्रेरणा देईल की, शास्त्र आणि अध्यात्म हे विरोधी नाहीत, तर एकमेकांना समृद्ध करणारे मार्ग आहेत.   

प्रकरण 1...................................................9
आधुनिक भौतिकशास्त्र-हृदयाचा मार्ग?

प्रकरण 2.........................................................14
जाणणे आणि पाहणे

प्रकरण 3...........................................................21
भाषेपलीकडे

प्रकरण 4..........................................................25
नवीन भौतिकशास्त्र

पूर्वेकडील अध्यात्मवादाचा मार्ग

प्रकरण 5...........................................................32
हिंदूसंस्कृतीतील अध्यात्मव मार्ग

प्रकरण 6......................................................38
बौद्ध धर्म - हीनयान आणि महायान

प्रकरण 7....................................................48
चीनी विचारसरणी

प्रकरण 8.................................................52
ताओवाद

प्रकरण 9..................................................59
झेन-प्रबोधनाची शिस्त

साम्यरेषा

प्रकरण 10...............................................66
सर्व गोष्टींचे ऐक्य

प्रकरण 11................................................75
विरोधाभासी जगाच्या पलीकडे

प्रकरण 12......................................................82
अवकाश - काळ

प्रकरण 13.............................................93
गतिशील विश्व

प्रकरण 14........................................................101
शून्यता आणि रूप

प्रकरण 15.....................................................110
ब्रह्मांडीय नृत्य

प्रकरण 16.....................................................120
क्वार्क समरूपता-एक नवीन कोआन?

प्रकरण 17.................................................127
बदलाचे नमुने

प्रकरण 18.....................................................135
परस्पर-भेदन

प्रकरण 19................................................141
उपसंहार

प्रकरण 20................................................148
भविष्यातील नवीन भौतिकशास्त्र - विज्ञानाच्या विचारसरणीत नवीन परिवर्तन

परिशिष्ट ................................................154
हिग्स क्षेत्र, हिग्स बोसॉन आणि त्यापलीकडे शोध

💬

Chat with us